पाटोदा, बीड 27 एप्रिल 2025 — महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एस.टी.) कामगारांच्या विविध मागण्यांसाठी लढा उभारत असताना, आज पाटोदा आगारात कामगार नेते व माजी आमदार जयप्रकाशजी छाजेड, एस.टी. वर्कर्स कॉग्रेसचे संस्थापक अध्यक्ष प्रितिश दादा छाजेड हे बीड विभागाच्या दौऱ्यावर असताना पाटोदा आगारामध्ये आगमन झाले त्यानिमित्ताने यांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक श्री. डी. ए. लिपणेपाटील तसेच कार्याध्यक्ष श्री. अशोक जाधव यांचाही सन्मान करण्यात आला. विभागीय सचिव श्री श्रीकांत येडे, राज्य कार्यकारिणी सदस्य गणेश चवरे, आगार अध्यक्ष शाहफैज शेख, कार्याध्यक्ष रंजित राऊत, राज्य वेब मीडिया प्रमुख भारत सुरवसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या वेळी उपस्थित कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना अध्यक्ष प्रितिश दादा छाजेड यांनी ठाम शब्दांत सांगितले, “कामगारांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही. महागाई भत्त्यात वाढ तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी संघर्ष तीव्र केला जाईल.” त्यांनी कामगारांच्या समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.
सत्कार समारंभादरम्यान छाजेड यांनी कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्याचा आणि योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या स्वागत सोहळ्यामुळे कामगारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी काळात कामगारांचे कोणतेही प्रश्न सोडवण्यासाठी आगारातील पदाधिकाऱ्यांना अधिक गती मिळणार आहे.
या कार्यक्रमाला श्री वंजारे अण्णा, श्री गर्जे, संजय पवार, शरद चवरे, आर व्ही शिंदे, एस आर पारखे व्हरकटे, श्री काळे, श्री बडगे, श्री राम भताने, भारत सुरवसे, माधव भताने, श्री तांदळे, श्री सानप, मिसाळ अप्पा असे आगारातील यांत्रिकी कर्मचारी, चालक, वाहक मोठ्या संख्येने उपस्थित होते