महाराष्ट्र सरकारच्या EV धोरण 2025 ला मंत्रिमंडळाची मंजुरी, इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर अनुदान व कर सवलतींची घोषणा. Maharashtra EV Policy 2025
मुंबई, 30 एप्रिल 2025: प्रतिनिधी – जी. बी वाघ
Maharashtra EV Policy 2025 महाराष्ट्र सरकारने राज्यातील प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरणपूरक वाहतूक प्रणालीस प्रोत्साहन देण्यासाठी नवीन इलेक्ट्रिक वाहन (EV) धोरण 2025 ला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
या धोरणानुसार, राज्यात EV खरेदी करणाऱ्या नागरिकांना अनुदान, कर सवलती, आणि टोलमाफी यांसारखे अनेक फायदे मिळणार आहे
धोरणाची मुख्य वैशिष्ट्ये: Maharashtra EV Policy 2025
● EV खरेदीवर अनुदान
इलेक्ट्रिक दुचाकी, तिनचाकी, आणि खासगी चारचाकी वाहनांवर वाहनाच्या मूळ किमतीच्या १०% पर्यंत अनुदान दिलं जाणार आहे.
व्यावसायिक वाहने, मालवाहू ट्रक, इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आदींसाठी १५% पर्यंत अनुदान मिळेल.
● रस्ते कर व नोंदणी शुल्कावर पूर्ण सूट Maharashtra EV Policy 2025
राज्यात नोंदणीकृत सर्व EV वाहनांना रस्ते कर, नोंदणी शुल्क आणि नूतनीकरण शुल्कात १००% सूट दिली जाणार आहे.
● टोलमाफी
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतू या प्रमुख मार्गांवर EV चारचाकी वाहने व बसेससाठी टोल पूर्णपणे माफ करण्यात येईल.
इतर राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर EV वाहनांसाठी ५०% टोल सवलत लागू होईल.
● चार्जिंग सुविधा विस्तार
प्रत्येक २५ किलोमीटर अंतरावर EV चार्जिंग स्टेशन उभारले जातील.
राज्य परिवहन महामंडळाच्या डिपोंमध्ये फास्ट चार्जिंग युनिट्स बसवले जातील.
धोरणाचा उद्देश आणि कालावधी
धोरणाची अंमलबजावणी ३१ मार्च २०३० पर्यंत राहणार आहे.
पुढील ५ वर्षांत धोरणासाठी ₹१,९९३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
२०३० पर्यंत १० लाख टन हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे आणि ३२ टन PM 2.5 प्रदूषण घटवणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,
“ही EV धोरण केवळ पर्यावरणपूरक नाही, तर महाराष्ट्रासाठी आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर आहे. रोजगारनिर्मिती, गुंतवणूक वाढ आणि वाहतूक क्षेत्रात नाविन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी हे धोरण महत्त्वपूर्ण आहे.”
Maharashtra EV Policy 2025
Maharashtra Electric Vehicle Policy
Electric Vehicle Subsidy Maharashtra
EV Policy India 2025
Maharashtra government EV scheme
Electric vehicle tax exemption
Toll exemption for electric vehicles
EV charging stations Maharashtra
Electric car subsidy in India
EV registration fee waiver
Green mobility policy Maharashtra
Sustainable transport India
EV benefits in Maharashtra
Pollution control EV policy
New EV policy India 2025
How to get EV subsidy in Maharashtra
Electric vehicle toll waiver on Mumbai Pune Expressway
EV policy benefits for two-wheelers and four-wheelers
EV charging infrastructure Maharashtra