कामगार नेते जयप्रकाशजी छाजेड संघटनेमार्फत नवीन आगार प्रमुखांचा सत्कार. Msrtc news
बीड – दि 26 एप्रिल 2025.
Msrtc news : नमस्कार मित्रानो बीड विभागातील पाटोदा आगार येथे आगार प्रमुख म्हणून श्री तिडके साहेब यांची नियुक्ती झाली असुन त्यानिमित्ताने कामगार नेते जयप्रकाशजी छाजेड महाराष्ट्र एस.टी. काँग्रेस चे पदाधिकारी यांच्यामार्फत आगार प्रमुखांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आगार प्रमुखांमार्फत कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. कर्मचाऱ्यांनी आगारातील कामे कशापद्धतीने करावे, तसेच आजच्या धाकधूकीच्या जीवनामध्ये कर्मचाऱ्यांनी टेंशन न घेता आपल्या अडचणी या एकमेकांसोबत मांडणे आवश्यक आहे जेणेकरून त्यामुळे डिप्रेशन मध्ये न जाता त्या अडचणीवर मार्ग काढता येऊ शकेल. Msrtc news Update
कामगारांनी काम करत असताना एक दुसऱ्यांना मदत करणे का आवश्यक आहे, झाडे लावणे का आवश्यक आहे तसेच पुढे चालून संपूर्ण आगारामध्ये झाडे लावून त्याचे संगोपन कसे करायचे याबाबद मोलाचे मार्गदर्शन आगार प्रमुख श्री तिडके साहेब यांनी केले. Msrtc news
यावेळी आगाराचे मुख्य कारागीर ( हेड मेकॅनिक ) श्रीकांत येडे साहेब , तसेच लिपिक टंकलेखक नाईकनवरे साहेब , गणेश चवरे रंजित राऊत, शाहफैज शेख, रमेश सानप, उद्धव अंकुशे , ये एस खान, श्री काशीद, गजानन चवरे, रसूल शेख, श्री गायकवाड, श्री पाचणकर असे अनेक यांत्रिकी कर्मचारी आणि संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते