Close Visit Mhshetkari

     

सरकारच्या योजने चा घ्या फायदा solar rooftop yojana

तुमच्या ऑफिस घराच्या छतावर लावा सोलर पैनल,सरकार च्या या योजने चा फायदा घ्या.Solar Rooftop Yojana

 Solar Rooftop Yojana: नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला जास्त वीज बिल येत असेल आणि त्या मुळे तुम्हाला त्रास होत असेल आणि तुम्हाला वीज बिलापासून मुक्त व्हायच असेल, तर सरकारच्या सोलर रुफटॉप  योजना आहे त्या योजने चा लाभ घ्या. भारतातील विजेचा प्रचंड प्रमाणात वापर होत आहे, सरकारने सौरऊर्जेला चालना देण्याच्या उद्देशाने “solar rooftop ही योजना”मागे सुरू केली होती, या योजनेचा लाभ 31 मार्च 2026 पर्यंत घेता.येणार आहे येथे आपण या आर्टिकल मध्ये सोलर रूफटॉप योजनेबद्दल तपशीलवार माहिती पाहणार आहोत. आम्ही सोलर रूफटॉप योजनेचे फायदे, उद्दिष्टे, आणि पात्रता यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया पाहनार आहोत.

सोलर रूफटॉप योजना.

भारत सरकारच्या “नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने” सुरू केलेल्या सोलर रूफटॉप योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे सौर ऊर्जेला चालना देणे, आहे त्या सोबतच विजेची बचत पण व्हावी तसेच पर्यावरणाचे रक्षण व्हावे. Solar rooftop या योजनेंतर्गत, तुम्ही तुमच्या घराचा छत असो किंवा , ऑफिसचा छत असो किंवा कारखान्यावर सोलर पॅनेल लावायचे असेल त्यासाठी सोलर रूफटॉप योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

कसा करायचा अर्ज.

मित्रांनो तुम्हाला सोलर रूफटॉप योजनेचा  लाभ घ्यायचा असेल त्यासाठी सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या आवडत्या विक्रेत्याकडून रुफटॉप सोलर पॅनल बसवून घ्यावे लागेल  त्यानंतरच तुम्ही या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर त्यांची जे काही प्रोसिजर आहे ते पूर्ण करायची आहे प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्ही अनुदानाचा लाभ घेऊ शकता,

अर्ज करण्याची प्रक्रिया.

मित्रांनो सोलर रूफटॉप योजना 2023 साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला सोलर रूफटॉप नॅशनल पोर्टलवर जावे लागेल,

1) पोर्टलच्या मुख्यपृष्ठावर “येथे नोंदणी करा येईल  त्यावर क्लिक करा.

2) यानंतर पोर्टलवर तुम्हाला राज्य, वीज वितरण कंपनी, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी टाकून नोंदणी करायचं आहे.

3) नोंदणी पूर्ण झाली कि पोर्टलवर लॉग इन करा.

4) लॉग इन केल्यानंतर, तुमच्या समोर एक पेज ओपन होईल रूफटॉप सोलरसाठी इथे अर्ज करायचा आहे.

5) अर्जामध्ये मागितलेली संपूर्ण माहिती योग्य भरा आणि नंतर सबमिट करा.

6) हे सर्व सादर केल्यानंतर विभागाकडून तुम्हाला मंजुरी मिळेल.

7) मंजुरी मिळाल्यानंतर, तुम्ही बसविलेल्या सौर पॅनेलची विभागाकडून काही लोक येऊन तपासणी करतील.

पडताळणी झाल्यानंतर सौर पॅनेल अनुदानाचे पैसे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात जमा केले होतील.

Please follow and like us:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial