पैशांची तंगी? PF खात्यातून अशा प्रकारे काढता येईल रक्कम, जाणून घ्या EPFO चे नियम
मुंबई | 16 मे 2025. प्रतिनिधी – महान्युज 18
PF Advance : नोकरदार वर्गासाठी दिलासादायक बातमी. जर तुम्ही आर्थिक अडचणीत असाल आणि तुमच्या पीएफ (PF) खात्यातून काही रक्कम काढण्याचा विचार करत असाल, तर कर्मचारी भविष्य निधी संस्था (EPFO) यासाठी काही ठराविक नियमांनुसार परवानगी देते. विविध गरजांसाठी आता PF मधून अॅडव्हान्स रक्कम काढणे शक्य आहे. जाणून घ्या कोणत्या परिस्थितीत किती रक्कम काढता येते आणि कोणत्या अटी लागू होतात.
लग्नासाठी मिळू शकते PFमधून मदत
EPF योजना 1952 अंतर्गत, जर एखाद्या सदस्याने किमान 7 वर्षांची सदस्यता पूर्ण केली असेल, तर तो आपल्या मुला-मुलींच्या किंवा भावंडांच्या लग्नासाठी PF खात्यातून अंशदानाचा (व्याजासह) 50% पर्यंत रक्कम काढू शकतो. यासाठी खात्यात किमान ₹1,000 शिल्लक असणे आवश्यक आहे. PF Advance
मुलांच्या शिक्षणासाठी देखील मिळते मदत
सदस्य आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी देखील निधी मागू शकतो. यातही अंशदानाचा 50% पर्यंत रक्कम मिळू शकते. ही सुविधा एका सदस्यासाठी आयुष्यात फक्त तीन वेळा वापरता येते.
घर खरेदी, बांधणी किंवा दुरुस्तीसाठीही शक्य
घर खरेदी किंवा बांधणीसाठी EPFO 5 वर्षांनंतर निधी देतो. घर बांधून 5 वर्षांनी त्याच्या दुरुस्तीसाठी रक्कम काढता येते. मात्र, घरसंबंधीच्या गरजांसाठी ही सुविधा फक्त एकदाच दिली जाते.
आरोग्याच्या आपत्कालीन परिस्थितीत मिळतो त्वरित निधी. PF Advance
सदस्य किंवा त्याच्या कुटुंबातील कोणालाही वैद्यकीय गरज निर्माण झाल्यास कोणतीही अट न ठेवता तात्काळ अॅडव्हान्स दिला जातो. यासाठी नोकरीत किती काळ झाला आहे याची अट नाही. कितीही वेळा ही मदत घेता येते.
निवृत्तीनंतर एक वर्ष आधी मिळू शकतो PFचा मोठा हिस्सा
EPFO च्या नियमानुसार, सदस्य निवृत्त होण्याच्या एक वर्ष आधी आपला 90% पर्यंत पीएफ निधी काढू शकतो. मात्र ही सुविधा फक्त एकदाच मिळते. PF Advance
अपंग सदस्यांसाठी विशेष तरतूद
शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या सदस्यांना सहाय्यक उपकरणे खरेदीसाठी त्यांच्या पगाराच्या सहा महिन्यांच्या रकमेइतकी, किंवा उपकरणाच्या किंमतीइतकी (जे कमी असेल ते) रक्कम मिळू शकते. अशी रक्कम दर 3 वर्षांनी एकदा काढता येते.
EPFO च्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती उपलब्ध. PF Advance
सर्व प्रक्रिया EPFO च्या अधिकृत वेबसाइटवर किंवा UMANG अॅपवरून ऑनलाइन करता येतात. गरजूंनी रक्कम काढण्यापूर्वी सर्व नियम वाचणे आणि समजून घेणे आवश्यक आहे.