MSRTC NCMC Card : नमस्कार मित्रानो राज्यातील (एसटी) प्रवाशांसाठी एक मोठा बदल लागू करण्यात आला आहे. महिलांना मिळणारी ५० टक्के भाडे सवलत आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणारा मोफत प्रवास यासाठी आता ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) बंधनकारक करण्यात आले आहे. यापूर्वी केवळ आधार कार्ड दाखवून सवलत मिळत होती; मात्र नवीन नियमानुसार प्रत्यक्ष सवलत घेण्यासाठी NCMC कार्ड स्कॅन करणे आवश्यक असेल. कार्ड नसल्यास पूर्ण तिकीट आकारले जाईल.
बदलामागील उद्देश काय? MSRTC NCMC Card
एसटी प्रशासनाने हा निर्णय सवलतींचा गैरवापर रोखण्यासाठी घेतला आहे. अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने सवलत घेतल्याच्या तक्रारी येत होत्या. डिजिटल प्रणालीमुळे प्रत्येक व्यवहार नोंदवला जाणार असून पारदर्शकता वाढणार आहे. तसेच कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देत सुट्या पैशांची अडचणही दूर होणार आहे.
NCMC कार्ड म्हणजे नेमके काय? MSRTC NCMC Card
NCMC हे एक प्री-पेड स्मार्ट कार्ड आहे. प्रवाशांनी आधी रक्कम रिचार्ज करायची आणि प्रवासावेळी ते कार्ड मशीनवर टॅप करायचे. भविष्यात हेच कार्ड इतर सार्वजनिक वाहतूक सेवांमध्येही वापरण्याचा प्रशासनाचा मानस आहे. त्यामुळे एकच कार्ड अनेक सेवांसाठी उपयुक्त ठरू शकते.
कार्ड कसे मिळवायचे? MSRTC NCMC Card
प्रवाशांनी आपल्या जवळच्या एसटी आगारात जाऊन स्मार्ट कार्ड काउंटरवर अर्ज करावा. अर्जासोबत आधार कार्ड आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी ‘सरल’ आयडी, तर दिव्यांग प्रवाशांनी UDID कार्ड सादर करणे बंधनकारक आहे. नोंदणीकृत मोबाईलवर OTP पडताळणी केली जाईल. नवीन कार्डसाठी सुमारे १९९ रुपये शुल्क आकारले जाईल. साधारण ३० दिवसांत कार्ड उपलब्ध होईल.
महत्त्वाच्या सूचना.
कार्डमध्ये किमान १०० रुपये शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. रिचार्ज सुविधा डेपो, अधिकृत अॅप किंवा मशीनद्वारे उपलब्ध असेल. महिलांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी सवलत सुरू ठेवण्यासाठी लवकरात लवकर NCMC कार्ड काढणे आवश्यक आहे.
डिजिटल पद्धतीमुळे प्रवास अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार असून प्रवाशांनी या बदलास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.



