Created by satiah, 06 October 2024
Employee-update :- नमस्कार मित्रांनो राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगानुसार वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत १६.०३.२०२४ रोजी वेतन त्रुटी निवारण समिती स्थापन करण्यात आली.employee news
सदर वेतन त्रुटी निवारण समितीचे काम प्रगतीपथावर असून सदर समितीला अंतिम अहवाल सादर करण्याची अंतिम तारीख ३१.१०.२०२४ आहे. यामुळे वेतन त्रुटी निवारण समिती सर्व विभागांतील वेतन त्रुटींची चौकशी करून त्याचा अहवाल राज्य सरकारांना मंजुरीसाठी पाठवेल. Employee-update
वित्त विभागाच्या दिनांक 11.09.2024 च्या निर्णयानुसार सदर समितीचे काम पूर्ण करण्यासाठी 31.10.2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्राप्त अहवालानुसार पदांच्या वेतन त्रुटीची चौकशी करून आपला अहवाल तयार करण्याची सूचना केली आहे.employee-update
सदर समितीला यापूर्वी 15.09.2024 पर्यंत सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती, तर वित्त विभागाच्या दिनांक 11.09.2024 च्या निर्णयानुसार सदर समितीला 31.10.2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. Employees news
सदर वेतन त्रुटी अहवालाला राज्य सरकारांनी मान्यता दिल्यास, दिवाळी सणापूर्वी राज्य कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगात वेतन त्रुटी दूर करून सुधारित वेतनश्रेणी लागू केली जाईल. Employees update today