बँक fd घेताना केवळ व्याजच नाही तर मॅच्युरिटी कालावधीसोबत या गोष्टी लक्षात ठेवा. अधिक फायदेशीर राहील : bank fd
How to select best bank fd :बँक एफडी करताना आपण काही महत्त्वाच्या मुद्यांची काळजी घेतली पाहिजे. खाली दिलेल्या अहवालात आम्ही या मुद्द्यांचे तपशीलवार वर्णन करणार आहोत.
सध्या, RBI ने रेपो दरात वाढ केल्यामुळे जवळपास सर्व सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका FD व्याजदर वाढवत आहेत. त्याच्या मुळे एफडीच्या (fd )वाढलेल्या व्याजावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूकदार हे गुंतवणूक करत आहेत.
बँक एफडी करताना तुम्ही व्याजदरासह काही गोष्टींची काळजी घ्यावी, अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.How to select best bank fd आमच्या या लेखामध्ये आम्ही या गोष्टींबद्दल सांगणार आहोत.
एकाच वेळी सर्व पैसे गुंतवू नका
तुम्ही कधीही एकाच एफडीमध्ये पूर्णपणे गुंतवणूक करू नका, परंतु ती काही भागांमध्ये करा. उदाहरणार्थ, तुम्हाला पाच लाख रुपयांची एफडी करावी लागेल, त्यानंतर एक लाख रुपयांची एफडी पाच भागांमध्ये करा.
याचा फायदा असा होणार की जर का तुम्हाला प्रत्येकी एक लाख रुपयांची एफडी मिळाली तर काही गरज पडल्यास ती एफडी (fd )तोडून तुम्ही तुमचे जे काही काम आहे ते पूर्ण करू शकता. त्यामुळे तुमचे नुकसान सुद्धा कमी होईल.
FD कार्यकाळ
मित्रांनो जास्त व्याजदराच्या आशेने तुम्ही कधीही फार मोठा कालावधी निवडू नये. तुम्ही जर असे केलात आणि तुम्हाला गरज भासली तर तुम्हाला FD तोडावी लागेल आणि त्यानंतर मुदतीपूर्वी पैसे काढण्यासाठी तुम्हाला एक टक्क्यापर्यंत दंड भरावा लागू शकतो.
व्याजासह एफडी कर्जाचे प्रमाण पहा
सर्व बँका FD वर कर्जाची सुविधा देतात. या कारणास्तव, व्याजासह एफडी कर्जाचे प्रमाण पाहणे देखील खूप महत्वाचे आहे, जेणेकरुन तुम्ही आवश्यक असल्यास एफडी तारण ठेवून कर्ज घेऊ शकता. ते ९० टक्क्यांपर्यंत असू शकते.
सतत उत्पन्न मिळविण्यासाठी जर तुम्ही एफडीमध्ये गुंतवणूक करत असाल.तर हा घटक फार महत्त्वाचा ठरतो. अशा स्थितीमध्ये एफडी (fd) मिळवण्यासोबतच बँक तुम्हाला व्याज देण्यासाठी कोणता पर्याय निवडत आहे हे सुद्धा जाणून घेने आवश्यक आहे. बँका साधारनता मासिक, त्रैमासिक व वार्षिक हे व्याज भरण्याचे पर्याय तुम्हाला देतात.
ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त व्याज
सर्व बँका ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याज देतात. त्यामध्ये 0.50 % ते 0.75 % एवढे असू शकते. अशा परिस्थितीमध्ये आपल्या घरात उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या नावावर एफडी करणे हे अधिक फायदेशीर ठरते.