Close Visit Mhshetkari

     

Credit card : पैशाची गरज भागवण्याव्यतिरिक्त, क्रेडिट कार्डचे इतर अनेक फायदे आहेत. तुम्ही असा फायदा घेऊ शकता.

Credit card : पैशाची गरज भागवण्याव्यतिरिक्त, क्रेडिट कार्डचे इतर अनेक फायदे आहेत, तुम्ही असा फायदा घेऊ शकता

Credit card tips : नमस्कार मित्रांनो आत्तापर्यंत, जर तुम्ही असा विचार करत असाल की क्रेडिट कार्डचा वापर फक्त आर्थिक मदतीसाठी केला जातो, तर आम्ही तुम्हाला सांगतो की त्यातून इतर अनेक फायदे मिळू शकतात. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याबद्दल.

आर्थिक आणीबाणीच्या परिस्थितीत आपण सर्वजण क्रेडिट कार्ड ( credit card )वापरतो. हे वापरकर्त्याला केवळ आर्थिक सहाय्यच देत नाही, तर वापरलेल्या रकमेची वेळेवर परतफेड केल्यास क्रेडिट स्कोअर सुधारण्यातही मदत होते.

व्याजमुक्त कर्जासह गुंतवणूक करा

क्रेडिट कार्ड वापरण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कसला ही व्याज न घेता पैसे दिले जातात. जर आपण इतर कोणत्याही स्त्रोताकडून पैसे घेतले, तर त्या बदल्यात आपल्याला मूळ रक्कम तसेच व्याजाची रक्कम द्यावी लागेल. त्यासाठी कोणत्याही क्रेडिट कार्डमधून credit card पैस्याचा वापर करण्यासाठी 50 दिवसांसाठी कोणत्याच व्याजाची गरज नाही.

म्हणून, ज्या रकमेला व्याज नाही अशी रक्कम मुदत ठेवींमध्ये (fd) गुंतवणूक करण्यासाठी आणि या बचत दरामधून व्याज मिळविण्यासाठी वापरण्यात येऊ शकते. नंतर, क्रेडिट कार्ड पेमेंटची देय तारीख जवळ आल्याने दुसर्‍या बँक खात्यातून ते फेड करा.

क्रेडिट स्कोअर वाढवण्यास मदत होते

जर तुम्ही अशे व्यक्ती असाल कि ज्याचा क्रेडिट स्कोअर (credit score ) किंवा CIBIL स्कोर सुरळीत नाही. तर तुम्हाला बँकेमधून कर्ज मिळणे फार कठीण होऊ शकते. ही परिस्थिती टाळण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे क्रेडिट कार्ड चा वापर करणे. क्रेडिट कार्ड खरेदी करणे आणि वेळेवर पैसे भरणे यामुळे तुमचा बिगडलेला क्रेडिट स्कोअर  (credit score )सुधारू शकतो.

क्रेडिट कार्डचा credit card वापर करण्याचा आणखी एक मोठा फायदा आहे तो म्हणजे विमा लाभ. अनेक क्रेडिट कार्ड विविध विमा फायदे देतात. ते वैयक्तिक अपघात विमा असो .किंवा प्रवास विमा असो खरेदी संरक्षण यासारखे अनेक वेगवेगळे फायदे देतात. म्हणून तुम्ही क्रेडिट कार्ड खरेदी करत असताना ते तुम्हाला विम्याचे संरक्षण देत आहे की नाही हे सुद्धा तपासने महत्वाचे आहे.

पुरस्कारांचे फायदे

क्रेडिट कार्डचा वापरकेल्याने तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट्स नंतर कॅशबॅक त्यानंतर एअर माईल आणि कार्डच्या वैशिष्ट्यांनुसार इतर वेगवेगळे फायदे तुम्ही मिळवू शकतात. म्हणून, कार्ड निवडण्याआगोदर तुमच्या गरजेनुसार ते निवडा. उदाहरणामध्ये तुम्ही कॅशबॅकला प्राधान्य देत असल्यावर कॅशबॅक क्रेडिट कार्ड निवडा. त्यानंतर तुम्ही गिफ्ट व्हाउचर घेत असल्यास रिवॉर्ड पॉइंट क्रेडिट कार्ड( credit card )निवडा..

Please follow and like us:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial