जेष्ठ नागरिकांसाठी मोठी बातमी, आता पोस्ट ऑफिस च्या या योजनेमध्ये मिळत आहे 8.2% व्याज, वाचा संपुर्ण माहिती

जेष्ठ नागरिकांसाठी मोठी बातमी, आता पोस्ट ऑफिस च्या या योजनेमध्ये मिळत आहे 8.2% व्याज, वाचा संपुर्ण माहिती

Senior Citizen Post Office Scheme : नमस्कार मित्रांनो रिटायर्नमेंट नंतर प्रत्येक जेष्ठ नागरिकाला असे वाटते की त्याची जमा केलेली बचत ही सुरक्षित असावी आणि त्या अंतर्गत नियमित उत्पन्न व्हावे. यासाठी पोस्ट ऑफिस हे काही बँकापेक्षा चांगली योजना जेष्ठ नागरिकांना उपलब्ध करून देत आहे म या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यानंतर चांगल्या प्रकारचे व्याज मिळण्याबरोबरच. संपुर्ण सुरक्षा पण मिळत आहे

जेष्ठ नागरिकांना मिळते जास्तीचे व्याज.

बऱ्याच बँका 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या ग्राहकांना सामान्य FD पेक्षा 0.50 टक्के अधिक व्याज देतात, तर काही बँका काही दिवसानंतर FD वर जास्तीचे व्याज देत आहेत

SCSS योजना ही सर्वात चांगले उपाय.

सीनियर सिटिजन सेविंग्स स्कीम (SCSS)  जेष्ठ नागरिकांना असलेल्या सर्वात लोकप्रिय असलेल्या योजनापैकी एक आहे. या योजनेवर 8.2 टक्के व्याज मिळते, जे की दर 3 महिन्याला ग्राहकांच्या खात्यामध्ये जमा होते.

या योजनेचा कालावधी 5 वर्ष आहे, ज्याला पुढील 3 वर्षाकरिता वाढविता येते. यामध्ये जास्तीत जास्त 30 लाख रुपया पर्यंत गुंतवणूक करता येते, या सोबतच आयकर अधिनियम Aarticl 80C अंतर्गत tax मध्ये माफी दिली आहे.

प्रत्येक महिन्याला व्याज पाहिजे असेल तर POMIS चांगला पर्याय आहे.

मित्रांनो जर तुम्हाला प्रत्येक महिन्याला निश्चित व्याज पाहिले असेल तर, पोस्ट ऑफिस मधील मंथली इन्कम स्किम POMIS तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. या योजनेवर सध्या 7.4 टक्के वार्षिक व्याज दिला जातो आणि व्याजाची रक्कम प्रत्येक महिन्याला खात्या मध्ये वर्ग केली जाते.

या योजनेमध्ये सिंगल खात्यामध्ये 9 लाख रुपये भरता येतात तर जॉईंट खात्यामध्ये 15 लाख रुपये भरू शकतात.

पोस्ट ऑफिस FD सुद्धा एक सुरक्षित पर्याय मानला जातो.

मित्रांनो पोस्ट ऑफिस च्या FD योजनेमध्ये 1 ते 5 वर्षाच्या गुंतवणूकिसाठी 6.9 ते 7. 5 टक्के व्याज मिळते, पाच वर्षाच्या FD वर Aarticle 80C अंतर्गत व्याजामध्ये कपातीचा लाभ दिला जातो.

कोणत्या बँका देतात जास्तीचे व्याज?

काही private आणि स्मॉल फायनान्स बँक जेष्ठ नागरिकांना 7 टक्के पेक्षा जास्त व्याज देतात, तर सरकारी बँकेमध्ये बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, आणि पंजाब अँड सिंध बँक आकर्षक व्याज दर देत आहेत.

गुंतवणूक करण्याअगोदर या गोष्टी नक्की वाचा.

वित्तीय माहिती असलेल्या कर्मचाऱ्यांचे मत आहे की गुंतवणूक करण्या अगोदर आपली महिन्याची पगार ची आवश्यकता तसेच गुंतवणुकीचा कार्यकाळ, वित्तीय गोळा बेरीज लक्षात असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणूकीसोबतच चांगला परतावा हवा असेल तर SCSS, POMIS, आणि पोस्ट ऑफिस FD सारख्या योजना जेष्ठ नागरिकांसाठी चांगल्या आहेत

गुंतवणूक करण्या अगोदर पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन माहिती घेऊनच नंतर गुंतवणूक करावी

Leave a Comment