शिंदे सरकार चा मोठा निर्णय सेवानिवृत्ती उपदानाची मर्यादा वाढली,आता मृत्यू उपदानाची मर्यादा वाढवून २० लाख होणार. Employees Gratuity news
Employees Gratuity news : नमस्कार मित्रानो आज सरकारची मंत्रिमंडळ बैठक झाली त्यात अनेक निर्णय घेण्यात आले त्यातीलच एक निर्णय म्हणजे राज्यातील निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्तीधारकांना सेवानिवृत्ती उपदान, (Gratuity )मृत्यू उपदानाची मर्यादा १४ लाखांवरून वाढवून आता २० लाख रुपये करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे . बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
संपूर्ण मंत्रिमंडळ यां ठिकाणी उपस्थित होते या निर्णयाची अंमलबजावणी १ सप्टेंबर २०२४ पासून करण्यात येईल. ज्यांना निवृत्ती वेतन योजना आहे, अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न अशासकीय महाविद्यालये आणि कृषी विद्यापीठ यातील निवृत्ती वेतनधारकांना हा निर्णय लागू राहणार आहे. Employees Gratuity news
आज दिवसभरात एकूण 36 वेगवेगळे निर्णय या बैठकीत घेतले गेले
कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ. अनुकंपा धोरणाही लागू.
राज्यातील कोतवालांच्या मानधनत दहा टक्के वाढ करण्याचा आज झालेल्या निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. तसेच कोतवाल संवर्गातील कर्मचाऱ्यांना अनुकंपा धोरण लागू करण्यासही मंजूरी देण्यात आली.
राज्यातील १२ हजार ७९३ कोतवालांना याचा लाभ मिळणार आहे. त्यांना मिळणाऱ्या १५ हजार रुपये इतक्या मानधनात ही वाढ देण्यात येईल. सेवेत असताना मृत्यू झाल्यास, किंवा गंभीर आजार, अपघात यामुळे असमर्थ ठरल्यास शासनाच्या अनुकंपा धोरणानुसार त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यासही मंजूरी देण्यात आली.