Close Visit Mhshetkari

     

या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश, महागाई भत्यांसह इतर मागण्या मान्य,  संघटनेकडून आंदोलन मागे. DA Allowance news.

या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश, महागाई भत्यांसह इतर मागण्या मान्य,  संघटनेकडून आंदोलन मागे. DA Allowance news.

DA Allowance news :  मुंबई : महागाई भत्त्यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदान येथे पुकारलेले आंदोलन सरकारसोबत झालेल्या यशस्वी चर्चेनंतर मागे घेतले आहे . सप्टेंबरपासूनच्या वेतनात ४२ टक्के महागाई भत्ता देण्यात येईल , तसेच पंधरा दिवसांत सर्व थकबाकीवर निर्णय घेण्यात येणार आहे , सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना व पत्नीला एसटीत मोफत प्रवास या सर्व मागण्या मान्य झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेकडून आंदोलन मागे घेण्याची घोषणा करण्यात आली आहे .

आंदोलनकर्त्यां कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत मंत्री उदय सामंत यांच्यासोबत दुपारी झालेल्या बैठकीनंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या कळवल्या . त्यानंतर सरकारकडून लेखी आश्वासन देत बहुतांशी मागण्या पूर्ण करण्यात आल्या . सुरू झालेले आंदोलन एकाच दिवसात मिटविण्यात सरकारला यश आले आहे त्यातील पुढीलप्रमाणे मागण्या मंजुर करण्यात आले आहेत. DA Allowance news

  • ” सप्टेंबर पेड इन ऑक्टोबरच्या वेतनापासून महागाई भत्ता ३४ टक्क्यांवरून ४२ टक्के देण्यात येईल
  • ■ सर्व थकबाकीसंदर्भात १५ दिवसांत मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री अर्थमंत्री , उद्योगमंत्री व एसटी कामगार संघटनेसमवेत चर्चा करून निर्णय घेतला जाईल “
  • सण उचल १२,५०० रुपये मूळ वेतनाची अट न घालता दिले जाईल
  • ■ कामगारांना १० वर्षासाठी सातवा वेतन आयोग देणे , एकतर्फी वेतनवाढीतील रु ४८४ ९ / – कोटींमधील उर्वरित रक्कम …. मूळ वेतनातील रु . ५००० / – , ४००० / – व २५०० / – मधील तफावती दूर करण्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल .
  • ■ कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना , तसेच सेवानिवृत्त कामगार व पत्नीस सर्व प्रकारच्या बसमध्ये कुठलाही फरक न आकारता मोफत पास देणार .

DA Allowance news

या संपूर्ण मागण्या संदर्भात चर्चा करण्यात आली

Please follow and like us:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial