अंबाजोगाई बसस्थानकात एस.टी. बसचा अपघात – तरुणाचा जागीच मृत्यू.

Irfan Shaikh
1 Min Read

अंबाजोगाई बसस्थानकात एस.टी. बसचा अपघात – तरुणाचा जागीच मृत्यू.

प्रतिनिधी – आर. आर.शेख. दि 29-मे 2025 

अंबाजोगाई शहरातील बस स्थानकात २९ मे रोजी सकाळच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. स्थानकाच्या पश्चिम प्रवेशद्वारातून एमएच-१४ एमएच-१७०१ क्रमांकाची एस.टी. बस आत येत असताना अंकुश मोरे (वय अंदाजे २२, रा. धानोरा बु.) हा तरुण बसच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाला.

अपघात घडल्यानंतर लगेच स्थानिकांनी आणि बसस्थानकावरील कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने स्वाराती रुग्णालयात हलवले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अपघातामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई पोलीस आणि एस टी प्रशासकीय कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि घटनेचा पंचनामा केला. सध्या अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

स्थानिक नागरिकांनी बसस्थानकात होणारी गर्दी, वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी आणि सुरक्षिततेच्या अभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.

Please follow and like us:
Share This Article
Leave a comment

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial