Post Office Saving Schemes
या योजनेत पती-पत्नीला 59,400 रुपये मिळतील, मिळेल चांगला लाभ
नमस्कार मित्रांनो, Post Office Saving Schemes पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना राबविल्या जातात. तशीच पोस्ट ऑफिसच्या एका योजनेमध्ये पती आणि पत्नी हे दोघे मिळून वर्षाला 59,400 रुपये कमवू शकतात.
आपण या मध्ये पोस्ट ऑफिसच्या अशाच योजने विषयी पुर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत.
सध्याच्या काळात बचत करण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक योजना आहेत. तशीच पोस्ट ऑफिस द्वारे एक योजना राबविली जाते. ज्या योजनेमध्ये पती आणि पत्नी मिळून वर्षाला 59,400 रुपये कमवू शकतात.
त्या योजनेचे नाव पोस्ट ऑफिस मंथली सेव्हिंग स्कीम (Post Office MIS) आहे. या योजनेमध्ये तुम्ही चांगले आणि निश्चित उत्पन्न मिळवू शकता.
तुम्हाला या योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला 4950 रुपये कमवू शकता.
पोस्ट ऑफिस मंथली सेव्हिंग स्कीममध्ये (Post Office MIS) पती आणि पत्नी दोघे मिळून प्रत्येक महिन्याला चांगली कमाई करू शकतात. यामध्ये तुम्हाला संयुक्त खाते देखील उघडता येते. या योजनेमध्ये तुम्हाला डबल फायदा कसा मिळेल हे पाहणार आहोत.
या योजनेमध्ये संयुक्त खात्याद्वारे, तुम्हाला डबल नफा होईल.
MIS योजना काय आहे ?
या योजनेमध्ये सिंगल आणि जॉइंट हे दोन्ही खाते उघडू शकता. तुम्हाला वैयक्तिक खाते उघडताना तुम्ही कमीतकमी 1000 रुपये आणि किमान 4.5 लाख रुपये गुंतवू शकता. पण जर तुम्ही संयुक्त खाते उघडले तर तुम्ही त्या खात्यामध्ये जास्तीत जास्त 9 लाख रुपये जमा करू शकतात.
ज्येष्ठ नागरिक आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या साठी ही योजना अतिशय फायदेशीर आहे.
MIS योजनेचे फायदे काय आहेत?
MIS या योजनेमध्ये दोन किंवा तीन लोक एकत्र मिळून संयुक्त खाते उघडू शकतात. ही या योजनेची चांगली गोष्ट आहे. या खात्यामधील मिळणारी रक्कम ही सर्व सभासदांना समान दिली जाते. तुम्ही तुमचे संयुक्त खाते कधीही एकाच खात्यात रूपांतरित करू शकतात.
जर तुम्हाला खात्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करायचा असेल तर सर्व सभासदांना एक संयुक्त अर्ज करावा लागेल.
MIS योजना कशी काम करते ?
MIS या योजनेमध्ये तुम्हाला 6.6 टक्के दराने वर्षाला व्याज दिले जाते. या योजनेमध्ये तुमच्या एकूण ठेवीवरील वर्षाच्या व्याजाच्या आधारे परतावा दिला जातो. त्यामुळे त्याचे प्रत्येक महिण्यानुसार 12 भाग केले जाते.
जर तुम्हाला हा भाग तुमच्या खात्यात जोडायचा असेल तर तुम्ही हा भाग तुमच्या खात्यात जोडू शकतात. तुम्हाला जर महिन्याला पैश्याची गरज नसेल तर तुम्ही ही रक्कम तुमच्या खात्यात जोडू शकता. तुम्ही ही रक्कम जोडल्यास तुम्हाला या रक्कमेवर व्याज मिळतो.
पती-पत्नी दोघांना कसा होईल फायदा ?
समजा जर पती-पत्नी यांनी जर या योजनेअंतर्गत जर संयुक्त खात्यात 9 लाख रुपये गुंतविले. 9 लाख रुपये ठेवीवर 6.6 टक्के व्याजाने वार्षिक परतावा 59,400 रुपये असेल . जर त्यांना 12 भागांमध्ये भागले तर म्हणजे महिन्याला 4950 रुपये होईल.
म्हणजेच तुम्ही तुमच्या खात्यामध्ये दर महिन्याला 4950 रुपये मागू शकता. तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ही योजना 5 वर्षानी आणि आणखी 5 वर्षासाठी वाढवू शकता.
हे ही वाचा ?
SBI बँकेची खातेधारकांना दिवाळी गिफ्ट, घरबसल्या काढता येणार SBI Personal Loan.