जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला १२ आमदार-खासदारांचा ठाम पाठिंबा. Maratha Aandolan 2025
मुंबई | २९ ऑगस्ट २०२५ – Maratha Aandolan 2025 : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. आझाद मैदानावर सुरू असलेल्या या आंदोलनाला राज्यभरातून मराठा समाजाचे मोठे समर्थन मिळत आहे. विशेष म्हणजे, आता राजकीय पातळीवरही या आंदोलनाला जोरदार पाठिंबा मिळू लागला आहे. तब्बल १२ आमदार आणि खासदारांनी जरांगे पाटील यांच्या मागण्यांना आपला ठाम पाठिंबा दिला आहे.
पाठिंबा देणारे नेते. Maratha Aandolan 2025
या यादीत विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर (धाराशिव), संजय बंडू जाधव (परभणी), बजरंग सोनवणे (बीड) यांचा समावेश आहे. तर आमदारांमध्ये कैलास पाटील (कळंब-धाराशिव), उत्तमराव जानकर (माळशिरस), नारायण पाटील (करमाळा), संदीप क्षीरसागर (बीड), राजेश विटेकर (पाथरी), विजयसिंह पंडित (गेवराई), प्रकाश सोळंके (माजलगाव), राजू नवघरे (वसमत) आणि डॉ. बाबासाहेब देशमुख (सांगोला) या नेत्यांनी सार्वजनिकरीत्या समर्थन दर्शवले आहे.
आंदोलनाच्या प्रमुख मागण्या. Maratha Aandolan 2025
जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी काही ठोस मागण्या केल्या आहेत –
- मराठा समाजाला OBC आरक्षण मिळावे.
- मराठे आणि कुणबी एकच असल्याचे शासनाने मान्य करावे.
- सातारा व मुंबई गॅझेटियरचा आधार घ्यावा.
- सगेसोयरे धोरण सर्व मराठ्यांना लागू व्हावे.
- आंदोलनकर्त्यांवर दाखल गुन्हे मागे घ्यावेत.


जरांगे पाटील यांची जिद्द. Maratha Aandolan 2025
आझाद मैदानात जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना जरांगे पाटील म्हणाले, “आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. मला गोळ्या घातल्या तरी चालतील, पण मी मागे हटणार नाही. विजय मिळवल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही.”


