23 लाख EPS-95 पेन्शनधारकांसाठी खुशखबर, पेन्शनधारकांना मिळणार मोठा लाभ.By Irfan Shaikh / September 8, 2024 September 8, 2024 Created by satish, 08 September 2024 Pension update :- नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने कर्मचारी पेन्शन योजनेत मोठा बदल केला आहे. या अंतर्गत सहा महिन्यांपेक्षा कमी अंशदायी सेवा असलेले कर्मचारी देखील ईपीएस पेन्शन फंडातून पैसे काढू शकतील. याचा डायरेक्ट फायदा खासगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जवळ पास 23 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. Employees update दरवर्षी कर्मचारी पेन्शन योजनेचे लाखो कर्मचारी सदस्य निवृत्ती वेतनासाठी आवश्यक 10 वर्षांची अंशदायी सेवा देण्यापूर्वीच योजना सोडतात. EPFO ने EPS पेन्शन फंडाच्या तरतुदींनुसार अशा सदस्यांना पैसे काढण्याचा लाभ दिला आहे. या आगोदर , EPFO सदस्यांना सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त अंशदायी सेवा पूर्ण केल्यावरच पैसे काढण्याचा लाभ मिळत होता.employee pension-update सहा महिन्यांपूर्वी कर्मचारी निवृत्ती वेतन योजना सोडलेल्या सदस्यांना त्याचा लाभ मिळत नव्हता यामुळेच अनिवार्य सेवा देण्यापूर्वी निवड रद्द करणाऱ्या सदस्यांचे अनेक दावे फेटाळण्यात आले. अहवालात म्हटले आहे की 2023-24 या आर्थिक वर्षात सहा महिन्यांपेक्षा कमी अंशदायी सेवेमुळे पैसे काढण्याच्या लाभाचे सुमारे सात लाख दावे फेटाळण्यात आले.employee news प्रत्येक महिन्याच्या सेवेचा विचार करून त्या प्रमाणात पैसे काढण्याचे फायदे दिले जातील याची खात्री करण्यासाठी सरकारने आणखी एक सुधारणा केली आहे. ईपीएस पेन्शन (पेन्शन फंड) च्या या सुधारणेमध्ये अशा सदस्यांचा समावेश आहे ज्यांनी योजनेच्या पात्रतेसाठी आवश्यक सेवा दिली नाही किंवा ज्या सदस्यांचे वय 58 वर्षे पूर्ण झाले आहे. आता काढता येणारी ( amount ) रक्कम सदस्याने किती महिन्यांची सेवा पूर्ण केली आहे आणि ज्या वेतनावर EPS योगदान प्राप्त झाले आहे त्यावर अवलंबून असेल.pension-update कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे काय? संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी 1995 मध्ये ईपीएस पेन्शन फंड सुरू करण्यात आला. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेसाठी पात्र असलेले कर्मचारी देखील पेन्शन योजनेसाठी पात्र आहेत.employees pension-update कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) द्वारे संचालित या निधीमध्ये नियोक्ते आणि कर्मचारी दोघेही योगदान देतात. या कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन सुरू करण्यासाठी किमान 10 वर्षे अंशदायी सेवा आवश्यक आहे.epfo update गट विमा योजना बंद EPFO ने 1 सप्टेंबर 2013 नंतर सेवेत रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ग्रुप इन्शुरन्स स्कीम (GIS) अंतर्गत मिळणारी वजावट त्वरित प्रभावाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.आत्ताच ईपीएफओ कडून यासंदर्भामध्ये एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे.pension-update 1 सप्टेंबर 2013 नंतर सेवेत रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांवरच या निर्णयाचा परिणाम होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या पगारातून केलेली कपात त्यांना परत केली जाईल. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात काही प्रमाणात वाढ होणार आहे. कर्मचारी पेन्शन योजनेत ही योजना १ जानेवारी १९८२ रोजी सुरू झाली. Please follow and like us: