Close Visit Mhshetkari

     

कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती / राजीनामा / मृत्यू / सेवेतून काढून टाकणे यासंदर्भातील प्रकरणे काढणार निकाली एकरकमी लाभ देण्या संबंधित नवीन GR आला Employees new GR 

कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती / राजीनामा / मृत्यू / सेवेतून काढून टाकणे यासंदर्भातील प्रकरणे काढणार निकाली एकरकमी लाभ देण्या संबंधित GR आला Employees new GR

नमस्कार मित्रानो एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस व ( Employees new GR )  मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचा-यांना सेवानिवृत्ती / राजीनामा / मृत्यू / सेवेतून काढून टाकल्यानंतर एल.आय.सी. मार्फत एकरकमी लाभ देण्याबाबतची योजना लागू करण्यास संदर्भाधीन दिनांक ३०.०४.२०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

Employees new GR सदर योजनेनुसार शासनामार्फत सुरुवातीला एल. आय. सी. ला योगदान देण्यात आले होते. तदनंतर अंगणवाडी कर्मचा-यांकडून योगदान जमा होणे आवश्यक होते. तथापि, अंगणवाडी कर्मचा-यांकडून योगदान देण्यास विरोध झाल्याने योगदान जमा होऊ शकले नाही.

सबब, शासनाकडून सुरवातीला उपलब्ध करण्यात आलेल्या योगदानामधून एल.आय.सी. ने एकरकमी लाभाची प्रकरणे निकाली काढल्यानंतर पुढील कालावधीतील म्हणजेच दिनांक ३१.३.२०२२ पर्यतंची प्रकरणे निकाली काढण्याकरिता संदर्भाधीन क्र. २ येथील दि. ३०.३.२०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये एल. आय.सी. ला रु. १००,०० (रुपये शंभर कोटी फक्त) इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. Employees new GR 

सबब, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दि. १.४.२०२२ पासूनच्या सेवानिवृत्ती/ राजीनामा / मृत्यू / सेवेतून काढून टाकणे या प्रकरणी शासन निर्णय दिनांक ३०.४.२०१४ मधील सुत्रानुसार आणि पुर्णपणे शासनामार्फत लाभ देण्यास मा. मंत्रीमंडळाच्या दिनांक २५.२.२०२४ रोजीच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे. त्यास अनुसरुन या संदर्भातील आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या अंगणवाडी कर्मचा-यांच्या दिनांक ०१.०४.२०२२ पासून ते ग्रॅज्युईटी लागू करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्ती / मृत्यू / राजीनामा / सेवेतून काढून टाकणे इ. प्रकरणी एकरकमी लाभ शासनामार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून संदर्भाधीन

शासन निर्णय क्रमांक ABAVI-2021/P.Kr.102/K.6

क्रमांक-१ येथील दिनांक ३०.४.२०१४ रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या सुत्रानुसार आणि पुर्णपणे शासनामार्फत देण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युईटी लागू करण्याबाबत घेण्यात येणाऱ्या धोरणात्मक निर्णयाचा शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून संदर्भाधीन क्रमांक-१ येथील दिनांक ३०.४.२०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये सुरु करण्यात आलेली एकरकमी लाभाची योजना बंद करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

2.

संदर्भाधीन दिनांक ३०.४.२०१४ रोजीच्या शासन निर्णयात नमूद केलेल्या सुत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत अंगणवाडी कर्मचा-यांना एकरकमी लाम मंजूर करण्याकरिता दिनांक १.४.२०२२ पासूनच्या एकरकमी लाभाच्या प्रकरणांची परिगणना करुन त्याप्रमाणे संबंधित अंगणवाडी कर्मचाऱ्यास लाभ अदा करण्याची कार्यवाही आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी तात्काळ करावी.

त्यानुषंगाने दिनांक १.४.२०२२ पासूनच्या आतापर्यंतंच्या प्रकरणांकरिता येणारा सुमारे रुपये ५०,०० कोटी एवढा खर्च सदर योजनेच्या संबंधित लेखाशीर्षाखाली उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या तरतुदीमधून Employees Government GR 

भागविण्यास मान्यता देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे यापुढील कालावधीतील म्हणजेच ग्रॅज्युइटीचा निर्णय होईपर्यंतच्या एकरकमी लाभाच्या प्रकरणांकरिता येणारा खर्च संबधित लेखाशीर्षाखाली उपलब्ध करण्यात येणाऱ्या तरतुदीमधून भागविण्यात यावा.

सदर शासन निर्णय मा. मंत्रीमंडळाच्या दिनांक २५.२.२०२४ रोजी पार पडलेल्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे…

६. सदर शासन निर्णय 26 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आला,महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०२२६१४३११२६८३० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

 

Please follow and like us:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial