Created by satish, 11 October 2024
Reserve bank of India :- नमस्कार मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची 51 वी एमपीसी बैठक 7 ऑक्टोबर रोजी सुरू झाली.सेंट्रल बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या बैठकीत घेतलेले निर्णय जाहीर केले. ते 5 निर्णय कोणते आहेत ज्यांचा तुमच्यावर आणि देशावर परिणाम होऊ शकतो ते पाहून घेवूत Rbi Guidelines.
कर्जाबद्दल मोठी घोषणा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरांनी कर्जासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. RBI च्या पतधोरण समितीने सलग 10व्यांदा व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. समितीने 51 व्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे.यानंतर रेपो दर 6.50% वर राहील. Rbi update
तर, रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्क्यांवर कायम आहे. बँक दर 6.75 टक्के कायम आहे.यावेळी 6 पैकी 5 सदस्यांनी एकमताने व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.
GDP अंदाज ठरवण्यात आला
RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी GDP अंदाज 7.2 टक्क्यांवरून 7 टक्क्यांवर आणण्याची घोषणा केली. Reserve bank of India
Q3 साठी GDP अंदाज 7.3 टक्क्यांवरून 7.4 टक्के, Q4 साठी 7.2 टक्क्यांवरून 7.4 टक्के आणि आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या त्रे मासिकसाठी GDP अंदाज 7.3 टक्के ठेवण्यात आला आहे. Reserve bank of India
FY25 साठी चलनवाढ ठरवण्यात आली
FY25 साठी किरकोळ चलनवाढीचा अंदाज 4.5 टक्के राखला गेला आहे. तो व्यवसाय वर्ष 2025 च्या दुसऱ्या त्रेमासिकसाठी 4.1 टक्के, तिसऱ्या तिमाहीसाठी 4.8 टक्के, चौथ्या त्रे मासिक साठी 4.2 टक्के आणि व्यावसायिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीसाठी 4.3 टक्के ठेवण्यात आला आहे. Rbi news
व्याज दर कमी करण्याकडे लक्ष
याशिवाय, धोरणाची भूमिका विथड्रॉवल ऑफ ॲकोमोडेशनवरून तटस्थ असा बदलण्यात आली आहे. याचा अर्थ आगामी निर्णयांमध्ये थोडी शिथिलता दिली जाऊ शकते.
आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन धोरण दर वाढवण्याची किंवा कमी करण्याची लवचिकता RBI कडे असेल. म्हणजे आगामी बैठकीत व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा आणखी वाढली आहे. Rbi update
महागाई वाढत असल्याचे ही ते म्हणाले
ते पुढे म्हणाले की अन्नधान्य आणि किमतीमुळे महागाई वाढू शकते. जागतिक संकट आणि प्रतिकूल हवामानामुळे महागाई वाढण्याचा धोका आहे. याशिवाय वस्तूंच्या किमती वाढल्याने महागाई वाढण्याचा धोका आहे. जगातील इतर चलनांच्या तुलनेत रुपयातील चढउतार कमी आहेत. Reserve bank of India