Close Visit Mhshetkari

     

लाडकी बहीण योजनेचे पैसे महाराष्ट्रात कोणत्या दिवशी येणार? शिंदे सरकारने सांगितली तारीख.

Ladki bahin Yojana :- नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेली ‘महाराष्ट्र लाडकी बहीण योजना’ खूप चर्चेत आहे. Ladki bahin Yojana

या योजनेमध्ये 21 ते 65 वर्षे वय असलेल्या पात्र महिलांना प्रत्येक महिना रु. 1500 ची आर्थिक मदत दिली जाईल. त्यामुळे या ( scheme)  योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला शासकीय कार्यालयामध्ये मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. Ladki bahin Yojana

सुरुवातीला या योजनेच्या पात्रतेच्या निकषांबाबत काहीसा संभ्रम होता, मात्र आता स्पष्टता आल्यानंतर महिलांना ही आर्थिक मदत कधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे. १ जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. Ladki bahin yojna

त्यामुळे जुलैपासून महिलांच्या ( bank account ) बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात होईल. तरीही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरूच आहे.ladki bahin Yojana

‘लाडकी बहीण योजने’चे पैसे ऑगस्टच्या 15 तारखे पासून महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै होती, मात्र अंगणवाडी, ग्रामपंचायत, केंद्र आणि सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी पाहता महाराष्ट्र सरकारने ती 31 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे.

या योजनेचे पैसे 14 ऑगस्टपासून महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार असून 15 ऑगस्टपर्यंत सर्व महिलांना ही रक्कम मिळणार आहे. यानंतर प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेला महिलांच्या ( bank account ) बँक खात्यामध्ये १५०० रुपये जमा केले जातील. Ladki bahin Yojana

अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • राशन कार्ड
  • उत्पन्नाचा पुरावा
  • रहिवासी पुरावा
  • बँक पासबुक
  • अर्जदाराचा फोटो
  • रहिवासी किंवा जन्म प्रमाणपत्र
  • विवाह प्रमाणपत्र

योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाइल ॲप किंवा सुविधा केंद्राद्वारे ऑनलाइन भरले जाऊ शकतात. ‘नारी शक्ती ॲप’वरही अर्ज भरता येईल. जे ऑनलाइन अर्ज करू शकत नाहीत ते अंगणवाडी केंद्रात जाऊन अर्ज करू शकतात. Ladki bahin yojana

Please follow and like us:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial