आता व्हाट्सऍप वरून करा पेमेंट, हि सुविधा ठरत आहे लाभदायक Whatsapp payment
Whatsapp वरून पेमेंट कसे करावे : सध्याच्या आधुनिक काळात असा एकही माणूस आपल्याला भेटणार नाही ज्याला Whatsapp माहित नाही किंवा ते वापरता येत नाही, आधी व्हाट्सऍपवर व्हॉईस कॉल, व्हिडिओ कॉल, ग्रुप व्हिडिओ कॉल होते पण यासोबत तुम्ही हे पेमेंट वापरू शकता.
अजूनही तुम्ही Whatsapp अपडेट केल नसेल तर लगेच Whatsapp अपडेट करून घ्या कारण याचा नवीन अपडेटमध्ये व्हाट्सऍप पेमेंटचे नवीन फीचर्स जोडले गेले आहे. व्हाट्सऍप पेमेंट्स वैशिष्ट्य भारतीय राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन किंवा NPCI च्या भागीदारीत डिझाइन केलेले आहे आणि ही एक युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस किंवा याच्या व्यतरिक्त UPI आधारित पेमेंट पद्धत सुद्धा आहे.
Whatsapp च्या नवीन इन्स्टॉल अँप्लिकेशन मध्ये तुम्हाला पेमेंट फीचर मिळेल , त्या फिचर च्या मदतीने तुम्ही व्हाट्सऍप द्वारे कोणालाही पैसे पाठवू शकता व त्याचा कडून पैसे घेऊ शकता.
तुम्ही UPI द्वारे Whatsapp Payments किंवा Whatsapp Pay द्वारे ऑनलाइन किती ही पैसे सहज पाठवू शकता.
स्टेप 1: सर्वात आधी तुम्हाला प्ले स्टोअरवरून तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सऍप डाउनलोड करावे लागेल.
स्टेप 2: त्यानंतर व्हाट्सऍप च्या तीन डॉटवर क्लिक करा व सेटिंग पर्याय उघडा.
स्टेप 3: सेटिंग मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे पेमेंटचा पर्याय दिसेल.
स्टेप 4: त्यानंतर तुम्हाला तुमचे बँक खाते लिंक करा असे सांगितले जाईल तेव्हा तुम्हाला तुमच्या बँकेचे नाव निवडून जोडायचे आहे.
स्टेप 5:त्यानंतर तुम्हाला काही नियम व अटी पहायला मिळतील ज्या तुम्ही काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
स्टेप 6: त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर बँक खात्या सोबत जोडायचा आहे.
स्टेप 7: आता तुमच्या समोर बँक खात्याची यादी ओपन होईल, तिथे तुम्हाला तुमची बँक निवडावी लागेल.
स्टेप 8: तपशीलवर , तुम्हाला तुमच्या डेबिट कार्डचा 6 अंकी नंबर प्रविष्ट करावा लागेल, तो तुमचा पिन आहे.
स्टेप 9: तपशील भरल्यावर सबमिट वर क्लिक करा,क्लीक केल्यानंतर तुम्ही आता तुमच्या व्हाट्सऍप द्वारे पेमेंट करू शकता.