एस टी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश ST Employee Dearness Allowance.
ST Employee Dearness Allowance : एस टी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आलेली आहे, कर्मचाऱ्यांना लवकरच त्यांच्या हक्काचा महागाई भत्ता ( Dearness Allowance) मिळणार आहे. तशा सूचनाच परिवहन विभागास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत.
या अगोदर ऑक्टोबर 2021 मध्ये ज्यावेळेस कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता त्यावेळी तत्कालीन परिवहनमंत्री अनिल परब यांनी त्यांचा DA 28% एवढा केला होता मात्र त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा DA Dearness Allowance दोन वेळेस म्हणजेच 28 चा 31 आणि 31 चा आता 34% एवढा करण्यात आला.
मात्र एस टी महामंडळाचे कर्मचारी मात्र यापासून वंचित होते, आज दुपारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे .
लवकरच येणाऱ्या नोव्हेंबर देय डिसेम्बर महिन्यातील वेतनात रक्कम वाढवून येईल यामुळे कर्मचाऱ्यांचा खुप दिवसापासून प्रतीक्षेत असणारा DA देण्याचा निर्णय आज घेण्यात आला. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाला आहे
7th pay commission