Created by satish, 19 February 2025
Senior citizens benefits :- नमस्कार मित्रांनो 2025 च्या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने अनेक सवलती आणि फायदे आणले आहेत.वृद्धांची आर्थिक सुरक्षा आणि राहणीमान सुधारण्यासाठी भारत सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.यामध्ये कर सूट, आरोग्य सुविधांमधील सुधारणा आणि बचत योजनांमधील बदल यांचा समावेश आहे.Senior Citizen New Benefits 2025
1. आयकर सूट मर्यादेत वाढ
अर्थसंकल्प 2025 मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आयकर सूट मर्यादा ₹12 लाख करण्यात आली आहे.हे नवीन कर प्रणाली अंतर्गत लागू होईल.यामुळे ज्येष्ठ नागरिकांना कर वाचवण्याची मोठी संधी मिळणार असून त्यांची बचत वाढणार आहे. Senior citizens update
2. व्याज उत्पन्नावरील TDS मर्यादा दुप्पट
मुदत ठेवी आणि इतर बचत योजनांवरील व्याज उत्पन्नावरील TDS मर्यादा ₹50,000 वरून ₹1 लाख करण्यात आली आहे.यामुळे ज्येष्ठ नागरिकांना जादा व्याज उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही, ज्यामुळे त्यांचा रोख प्रवाह सुधारेल.
3. राष्ट्रीय बचत योजनेवर NSS कर सूट
आता NSS खात्यातून पैसे काढण्यावर कोणताही कर लागणार नाही, जर ही रक्कम 29 ऑगस्ट 2024 नंतर काढली गेली असेल.या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला आहे ज्यांना कोणत्याही अतिरिक्त कराच्या बोजाशिवाय त्यांच्या बचतीचा लाभ घ्यायचा आहे. Senior citizens news
4. आरोग्य विमा प्रीमियमवरील GST मध्ये कपात
आरोग्य विमा प्रीमियमवरील जीएसटी दर 18% पेक्षा कमी करण्याचा प्रस्ताव आहे.यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विमा पॉलिसी घेणे अधिक परवडणारे ठरणार आहे. Senior citizens benefits
5. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील बदल (SCSS)
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) मध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा ₹15 लाखांवरून ₹30 लाख करण्यात आली आहे. तसेच, त्याचा व्याज दर 8.2% प्रतिवर्ष ठेवला गेला आहे. यामुळे कर्मच्यारी आकर्षक गुंतवणूक करू शकणार आहेत.
6. भाड्यावर टीडीएस मर्यादेत वाढ
भाड्यावर टीडीएसची वार्षिक मर्यादा ₹2.4 लाखांवरून ₹6 लाख करण्यात आली आहे.सेवानिवृत्तीनंतर भाड्याच्या उत्पन्नावर अवलंबून असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हे फायदेशीर ठरेल. Senior citizens scheme