भारतामध्ये सरकारने घातली बेटिंग गेम खेळण्यावर बंदी online betting ban in india
नमस्कार मित्रांनो : New Gaming Rules इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) भारतातील ऑनलाइन गेमिंगचे नियमन करणाऱ्या कायद्यांमध्ये मोठे बदल केले आहेत. भारत सरकारने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार, SROs ठरवतील की देशात विशिष्ट ऑनलाइन गेम चालवायला द्यायचा की नाही. सरकारने देशात ऑनलाइन बेटिंग आणि सट्टेबाजीवरही बंदी घातली आहे. (online betting ban in india)
कोणताही गेम नियम न पाळल्यास भारतात त्यावर बंदी घालण्यात येईल, असेही सरकारने म्हटले आहे. ऑनलाइन गेमिंग अधिक चांगले आणि सुरक्षित करण्यासाठी सरकारने हे नियम लागू केले आहेत.
गेम सुरू करण्यासाठी घ्यावी लागनार परवानगी
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) नवीन नियमानुसार, विकासकांना कोणताही गेम लॉन्च करण्यापूर्वी किंवा रिलीज करण्यापूर्वी SRO ची परवानगी घ्यावी लागेल. नवीन नियमाबद्दल स्पष्टीकरण देताना, सरकारने सांगितले की आम्ही अशी फ्रेमवर्क तयार करत आहोत, ज्याद्वारे SRO देशात लॉन्च झालेल्या प्रत्येक गेमवर बारीक नजर ठेवेल. तो स्पोर्ट्स बेटिंगशी संबंधित आहे की ऑनलाइन बेटिंगशी संबंधित आहे हे SRO ठरवेल. जर गेम नियमांनुसार नसेल तर तो लॉन्च केला जाणार नाही.(betting apps banned in india)
केंद्रीय मंत्री चंद्रशेखर यांनी पुढे सांगितले की खाजगी कंपन्यांनी एसआरओसाठी अनेक मॉडेल सादर केले आहेत, ज्यांचा विचार केला जात आहे. परंतु गरज पडेल तसे आणखी जोडू. यासह, जे डेव्हलपर्स त्यांच्या गेमच्या कोणत्याही आयटमसाठी पैसे घेतात त्यांना केवायसी करणे आवश्यक आहे.
नवीन गेमिंग नियम
- नवीन नियमांनुसार, सरकारने गुगल प्ले आणि ऍप्पल ऍप स्टोअरला त्यांच्या स्टोअरवर गेम न ठेवण्याचे आदेश दिले आहेत, जे वापरकर्त्यांसाठी हानिकारक आहेत.
- यासोबतच गुगल प्ले आणि ऍपल ऍप स्टोअरलाही ते गेम त्यांच्या स्टोअरवर ठेवावे लागणार नाहीत, ज्यांना केंद्र सरकारच्या SRO कडून परवानगी मिळालेली नाही.
- नवीन नियमानुसार, जर एखाद्या गेमला SRO कडून परवानगी मिळाली नसेल, तर त्याचे प्रमोशन थांबवले जाईल.
- सरकारच्या नवीन गेमिंग नियमांनुसार, गेमिंग प्लॅटफॉर्मला पैसे घेणाऱ्या गेमसाठी SRO कडून परवानगी घ्यावी लागेल आणि सत्यापन चिन्ह दाखवावे लागेल.
- जर गेमिंग प्लॅटफॉर्मने केंद्र सरकारशी संबंधित जर का कोणती चुकीची माहिती सादर केली किंवा कुठे शेअर केली, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.