PPF खातेधारकांनी सावधगिरी बाळगावी, ही चूक त्यांना महागात पडू शकते.PPF Scheme
PPF Scheme : नमस्कार मित्रांनो सरकारद्वारे चालवल्या जाणार्या अनेक योजनांमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) देखील आहे. या योजनेमधून नागरिकांना बचत करण्यासाठी प्रोत्साहन करण्यात येते.
ही एक अशी योजना आहे, ज्यामध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करून मोठा निधी तयार केला जाऊ शकतो. मात्र, पीपीएफमध्ये गुंतवणूक करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, अन्यथा नुकसान सोसावे लागू शकते.
पीपीएफ ही दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. या योजनेत रुपये गुंतवीण्याचा कालावधी हा पंधरा वर्षांचा आहे. म्हणजेच, परिपक्वता कालावधी 15 वर्षे आहे. यामध्ये १५ वर्षानंतरच पैसे मिळतात. त्याचबरोबर या योजनेत सध्या वार्षिक ७.१ टक्के दराने व्याज दिले जाते.
पीपीएफ योजनेत दरवर्षी किमान 500 रुपये गुंतवावे लागतात. आणि त्याच वेळी कमाल 1.5 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करण्यात येऊ शकते. दुसरीकडे, जर पीपीएफ खातेधारकाने एका वर्षात 500 रुपये देखील जमा केले नाहीत तर त्याचे पीपीएफ खाते निष्क्रिय होईल.
यानंतर, हे खाते पुन्हा सक्रिय करावे लागेल, ज्यामध्ये काही रक्कम दंड म्हणून भरावी लागेल. दुसरीकडे, ज्या वर्षी किमान 500 रुपये गुंतवले गेले नाहीत, त्या वर्षी मिळालेल्या व्याजाचा तोटाही सहन करावा लागू शकतो.
अशा परिस्थितीत, प्रत्येकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की पीपीएफ खात्यात दरवर्षी किमान गुंतवणूक करणे आवश्यक आहे, जेणेकरून पीपीएफ खाते निष्क्रिय होणार नाही.