नवी दिल्ली : NPS Pension Scheme जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकार नव्या पेन्शन योजनेचा आढावा घेणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत वित्त विधेयक मांडताना ही माहिती दिली. NPS Pension Scheme
वित्त सचिवांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. ही समिती नव्या पेन्शन योजनेचा आढावा घेणार आहे. लोकसभेत काही दिवसापूर्वी जोरदार घोषणाबाजी आणि गदारोळात अर्थमंत्र्यांनी वित्त विधेयक मांडले होते . गदारोळात वित्त विधेयक २०२३ वर मतदान झाले. वित्त विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे.
नवीन पेन्शन योजना कधी लागू करण्यात आली? NPS Pension Scheme
2004 पूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत निवृत्तीनंतर निश्चित पेन्शन मिळत असे. ही पेन्शन कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वेळीच्या पगारावर आधारित होती. या योजनेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनाही पेन्शन मिळावी, असा नियम होता. NPS Pension Scheme
परंतु अटलबिहारी वाजपेयी सरकारने एप्रिल 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना बंद केली. त्याजागी नवी पेन्शन योजना लागू झाली. नंतर राज्यांनीही नवीन पेन्शन योजना लागू केली.
नवीन पेन्शन योजनेची वैशिष्ट्ये NPS Pension Scheme
1. NPS मध्ये, कर्मचार्यांच्या मूळ पगाराच्या 10 टक्के + DA कापला जातो.
2. NPS शेअर बाजारावर आधारित आहे. त्यामुळे ते फारसे सुरक्षित नाही.
3. निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन मिळविण्यासाठी, एनपीएस फंडाच्या 40% एनपीएसमध्ये गुंतवावे लागतात.
4. ही योजना निवृत्तीनंतर निश्चित पेन्शनची हमी देत नाही.
5. नवीन पेन्शन योजना शेअर बाजारावर आधारित आहे. त्यामुळे येथेही कराची तरतूद आहे.
6. नवीन पेन्शन योजनेत 6 महिन्यांनंतर मिळणार्या महागाई भत्त्याची (DA) कोणतीही तरतूद नाही.