मुंबई – Irfan Shaikh
MSRTC DA Allowance :नमस्कार मित्रानो अखेर एस टी कर्मचाऱ्यांना 8 टक्के DA मंजुर करण्यात आलेला आहे. आता ST कर्मचाऱ्यांना राज्य शासनाप्रमाणे 42 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
कामगार संघटनेमार्फत 11 सप्टेंबर रोजी उपोषण करण्यात आलेले होते त्यावेळी झालेल्या बैठकीमध्ये 42 टक्के महागाई भत्ता देण्याचे आश्वासन देण्यात आलेले होते. MSRTC DA Allowance तसेच मागील वेतनातील तफावत दूर करण्यात यावी तसेच, सातवा वेतन आयोग कर्मचाऱ्यांना लागु करण्यात यावा अशा काही विषयावरही चर्चा करण्यात आलेली होती.
यातील सर्व तफावत दूर करून, सातवा वेतन संबंधित अभ्यास करण्यासाठी शासनाकडून त्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. ही समिती अभ्यास करून 6 महिन्यामध्ये अहवाल सादर करणार आहे. MSRTC DA Allowance
येणाऱ्या 7 तारखेतील वेतनामध्ये आता कर्मचाऱ्यांना 42 टक्के महागाई भत्याची रक्कम दिली जाणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांना थोडासा दिलासा मिळणार आहे.
MSRTC DA Allowance