Created by sangita lokhande, Date – 26/08/2024
Lakhpati didi yojana :- नमस्कार मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील जळगाव येथे 11 लाख लखपती दीदींचा गौरव केला. यावेळी ते म्हणाले की, लखपती दीदी योजनेचे हे अभियान भगिनी आणि मुलींना आर्थिक स्तरावर मजबूत करेल आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब आणि येणाऱ्या पिढ्यांना सक्षम करेल.Lakhpati didi yojana
भारत सरकारने या योजनेद्वारे अंदाजे तीन कोटी महिला करोडपती बनविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. लखपती दीदी योजना हा भारत सरकारद्वारे चालवला जाणारा महिलांसाठी विशेष प्रकारचा कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम आहे.Lakhpati didi yojana
या योजनेच्या माध्यमातून सरकार महिलांना स्वयंरोजगाराच्या दिशेने चालना देऊ इच्छित आहे. त्यामुळे महिला आर्थिकदृष्ट्या मजबूत होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात लखपती दीदी योजनेचा अनेकदा उल्लेख केला आहे. Lakhpati didi yojana Maharashtra
लखपती दीदी योजनेंतर्गत सरकार महिलांना ५ लाख रुपयांचे कर्ज देते. विशेष म्हणजे या कर्जावर महिलांना कोणत्याही प्रकारचे व्याज द्यावे लागणार नाही. हे बिनव्याजी कर्ज आहे. Lakhpati didi yojana
- जर तुम्हालाही लखपती दीदी ( lakhpati didi scheme ) योजनेचा लाभ मिळवायचा असेल, तर सर्वात आगोदर तुम्हाला बचत गटातमध्ये सहभागी व्हावे लागेल.
- यानंतर, जर एखाद्या महिलेला स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तिला तिच्या प्रादेशिक बचत गटाच्या कार्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रे आणि तिची व्यवसाय योजना सादर करावी लागेल.
- 18 ते 50 वयोगटातील महिला लखपती दीदी योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- ज्या महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकरी आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
तुम्हाला लखपती दीदी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
- आधार कार्ड,
- पॅन कार्ड,
- उत्पन्नाचा पुरावा,
- बँक पासबुक,
- पासपोर्ट आकाराचा फोटो,
- मोबाईल नंबर
इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे हे कागदपत्र नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.
Credit by :- www.amarujala.com