LPG गॅस सबसिडी तुम्हाला किती मिळते, घरबसल्या पहा 2 मिनिटांत LPG GAS Subsidy check Update.
नमस्कार मित्रानो सरकार कडुन LPG गॅस सिलेंडर वापरणाऱ्या नागरिकांना सरकार कडुन सबसिडी दिली जाते. कधी कमी कधी जास्त सबसिडी येते परंतु अजुनही बऱ्याच लोकांना माहिती नाही कि त्यांच्या नावे एकूण किती सबसिडी येते, जर तुम्हाला ही LPG Gas Subsidy दिली जाते तर ती कशी पहावी ते आपण या लेखामध्ये पाहूया.
सरकार मार्फत विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत असतात त्यातच केंद्र सरकार ने प्रधानमंत्री उज्वला योजना सुरु केली होती, त्यात बऱ्याच लोकांनी हे gas चे फ्री कनेक्शन घेतले होते त्यांच्या सुद्धा खात्यामध्ये सबसिडी टाकण्यात येत आहे.
सरकार कडुन इतकी मिळते Gas Subsidy
मित्रानो सरकार मार्फत ग्राहकांच्या खात्यामध्ये 12 रुपयापासून 200 रुपयापर्यंत सबसिडी दिली जाते ही सबसिडी ग्राहकांच्या डायरेक्ट खात्यामध्ये जमा केली जाते, तुम्हाला किती मिळते सबसिडी आपण खाली चेक करूया.
✔️ अशी पहा तुमची LPG Gas Subsidy.
- मित्रानो तुम्हाला तुमची gas सबसिडी पाहण्यासाठी अगोदर mylpg.in या दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- वेबसाईट वर गेल्यानंतर तुमचे gas कनेक्शन कोणत्या कंपनीचे आहे ते निवडा उदा. HP Gas, इंडेन Gas, Bharat Gas.
- तुमची gas कंपनी निवडल्यानंतर संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायची आहे तेथे तुमची व्यवस्थित रजिस्ट्रेशन होईल.
- नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मेल आयडी वर एक ऍक्टिव्हेशन लिंक येईल त्या लिंक ला क्लिक केल्यास तुमचे खाते active होईल.
- नंतर mylpg.in या वेबसाईट वर जा लॉगिन करा.
- लॉगिन झाल्यास बुकिंग हिस्ट्री पहा, आणि आपली सबसिडी चेक करा.
अशा प्रकारे तुमचे सबसिडी चे जमा पैसे तुम्ही चेक करू शकतात.