Lic च्या या योजनेमध्ये एकदा गुंतवणूक करा, तुम्हाला दरमहिना मिळणार पेन्शन.
Lic new jeevan shanti : नमस्कार मित्रांनो तुम्हाला या lic च्या नवीन स्कीम बद्दल माहित आहे का lic च्या या नवीन जीवन शांती योजनेमध्ये गुंतवणूक करून, तुम्ही दर महिन्याला स्वतःसाठी पेन्शनची व्यवस्था करू शकता. आणि जर पॉलिसी घेतली तर ही पॉलिसी घेणाऱ्यांना इतर अनेक अशा भरपूर सुविधा मिळतात.
मित्रांनो आपल्या देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी म्हणजे भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) कडे सर्व वयोगटातील लोकांसाठी ही पॉलिसी आहेत.LIC लहान मोठा कोणीही असो सर्वांना गुंतवणूक करण्यासाठी आपली योजना ऑफर करते. साधारणपणे LIC मध्ये गुंतवणूक करणे हे सुरक्षित मानले जाते. एलआयसीच्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि त्या योजना खूप लोकप्रिय आहेत, ज्यामध्ये गुंतवणूक केल्यानंन्यात लोकांना चांगला फायदा मिळू शकतो. LIC ची अशीच एक योजना आहे ती म्हणजे नवीन जीवन शांती पॉलिसी. यामध्ये गुंतवणूक केल्या नंतर तुम्ही निवृत्तीझाल्या वर निवृत्ती वेतन घेऊ शकता. एलआयसीच्या या योजनेमध्ये तुम्ही कमी गुंतवणूक करून भरपूर नफा मिळवू शकता.
जीवन शांती पॉलिसी ही एक वार्षिकी योजना आहे.
मित्रांनो LIC ची नवीन जीवन शांती योजना ही एक वार्षिक योजना आहे. याचा अर्थ असा आहे कि तुम्ही ही पॉलिसी खरेदी केल्यानंतर तुमच्या पेन्शनची रक्कम फिक्स होते. याच्यामध्ये तुम्हाला दरमहिन्याला पेन्शन मिळण्याची सुविधा मिळते. या पॉलिसीमध्ये तुम्हाला दोन पर्याय दिले जातात पहिला पर्याय म्हणजे एकल जीवनासाठी स्थगित वार्षिकी आणि दुसरी आहे संयुक्त जीवनासाठी स्थगित वार्षिकी. या पहिल्या पर्यायांतर्गत, तुम्ही फक्त एका व्यक्तीसाठीच पेन्शन योजना घेऊ शकता.