Tue. May 20th, 2025

मुंबई. 05 May 2025 – प्रतिनिधी महा न्युज 18

महाराष्ट्र 12 वी चा निकाल जाहीर यंदाही मुलींची पुन्हा बाजी. HSC Result 2025 

HSC Result 2025  : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) 2025 चा बारावी (HSC) चा निकाल जाहीर केला असून यंदाचा एकूण उत्तीर्ण टक्का 91.88% इतका आहे.

मुलींची आघाडी कायम

गेल्या वर्षांप्रमाणेच यंदाही मुलींनी मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. मुलींचा उत्तीर्ण टक्का 94.58% असून मुलांचा 89.51% आहे. त्यामुळे मुली 5.07% अधिक उत्तीर्ण ठरल्या आहेत.

विभागानुसार निकाल HSC Result 2025 

कोकण विभाग: 96.74% (सर्वोच्च)

कोल्हापूर: 93.64%

मुंबई: 92.93%

लातूर: 89.46% (सर्वात कमी)

प्रवाहितून यशाचे प्रमाण

विज्ञान: 97.35%

वाणिज्य: 92.68%

कला: 80.53%

व्यावसायिक अभ्यासक्रम: 83.3%

विद्यार्थ्यांची संख्या

नोंदणीकृत: 14,27,085

परीक्षेला बसलेले: 14,17,969

उत्तीर्ण: 13,02,873

गेल्या वर्षीच्या 93.37% च्या तुलनेत यंदा थोडीशी घट झाली आहे. HSC Result 2025 

निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे

mahresult.nic.in

mahahsscboard.in

hscresult.mkcl.org

results.digilocker.gov.in

निकाल पाहण्याची प्रक्रिया:

1. वरील संकेतस्थळावर जा

2. “HSC Examination Result 2025” या लिंकवर क्लिक करा

3. आपला रोल नंबर आणि आईचे पहिले नाव टाका

4. माहिती सबमिट करा आणि निकाल पाहा

5. गुणपत्रक डाउनलोड करा आणि प्रिंट काढा

महत्त्वाच्या तारखा. HSC Result 2025 

गुणपत्रक वितरण: 6 मे 2025 पासून शाळा/महाविद्यालयात

पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज: 20 मे 2025 पर्यंत

पूरक परीक्षा: अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लवकरच सूचना

Please follow and like us:

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial