GPF Interest rate : सरकारने General Provident Fund म्हणजेच GPF च्या व्याजदरांना जुलै ते सप्टेंबर महिन्यांसाठी 7.1% वर कायम ठेवले आहे या मधे सध्या कोणताही बदल झालेला नाही.
नवीन आलेल्या अपडेट नुसार 1 जुलै 2023 ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत GPF च्या investment वर 7.1% व्याज मिळेल. Department of Economic Affairs कडून मंगळवारी जारी केलेल्या नोटीस नुसार वर्ष 2023-24 दरम्यान सामान्य भविष्य निधी आणि त्याच प्रकारच्या दुसऱ्या fund subscriber च्या total जमा रकमेवर दिला जाणारा व्याज हा 7.1% च्या rate ने लागू राहील.(GPF interest rate)
काय आहे General Provident Fund?
General Provident Fund आपल्या देशामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाचे माध्यम आहे. PF प्रमाणेच यामध्ये कर्मचारी त्यांच्या salary चा काही भाग GPF मधे invest करतात. सरकार कर्मचाऱ्यांना retirement आणि financial emergency च्या condition मधे GPF मधून पैसे काढण्याची परवानगी देते
कोणकोणत्या funds वर लागू होईल हे व्याजदर?(GPF interest rate)
1) सामान्य भविष्य निधि (केंद्रीय सेवा)
2)अंशदायी भविष्य निधि (भारत)
3)राज्य रेलवे भविष्य निधि
4)सामान्य भविष्य निधि (रक्षा सेवा)
5)भारतीय आयुध विभाग भविष्य निधि
6)भारतीय आयुध कारखाना कामगार भविष्य निधि
7)भारतीय नौसेना गोदी कामगार भविष्य निधि
8)रक्षा सेवा अधिकारी भविष्य निधि
9)सशष्त्र सेना कार्मिक भविष्य निधि