Created by satish, 29 march 2025
Employee news :- नमस्कार मित्रांनो नुकतीच आलेल्या अपडेट नुसार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे.त्रिपुरा नंतर, आता सिक्कीम सरकारने महागाई भत्ता DA आणि महागाई सवलत DR मध्ये 3 टक्के वाढ करून आपल्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना भेट दिली आहे. हे नवीन दर लवकरच लागू होणार आहेत.Da Hike 2025
सिक्कीममधील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी
राज्यातील प्रेम सिंह तमांग सरकारने चैत्र नवरात्र आणि ईदपूर्वी राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एक मोठी भेट दिली आहे. सिक्कीम सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ जाहीर केली आहे.सभागागृहात मंत्र्यांनी याचे स्पष्टीकरण ही दिले आहे. Da update
सिक्कीम सरकारने राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता आणि महागाई सवलत यामध्ये 3 टक्क्यांनी वाढ केली आहे, त्यानंतर डीए/डीआर 50 वरून 53 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
नवीन दर 1 जुलै 2024 पासून काउन्ट केला जाणार आहे,अशा परिस्थितीत जुलै 2024 ते फेब्रुवारी 2025 पर्यंतची थकबाकी उपलब्ध करण्यात येणार आहे.यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगलीच वाढ होणार आहे.
वित्त विभागाच्या आदेशात ही माहिती दिली
वित्त विभागाच्या लेखा नियंत्रक आणि सचिवांनी जारी केलेल्या परिपत्रकात असे सांगण्यात आले की, राज्य सरकारने सुधारित मूळ वेतन रचनेअंतर्गत वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि निवृत्तीवेतनधारकांना महागाई सवलत 50 टक्क्यांवरून 53 टक्के केली आहे. Da hike
जुन्या वेतन रचनेअंतर्गत पेन्शन मिळवणाऱ्या लोकांचा डीआर 239 टक्क्यांवरून 246 टक्के करण्यात आला आहे.हा बदल 1 जुलै 2024 पासून देखील लागू होईल.
पूर्व-सुधारित मूळ वेतन रचनेअंतर्गत पेन्शन मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांचा डीआर सध्याच्या 239 टक्क्यांवरून 246 टक्क्यांपर्यंत वाढवला जाईल. Employees news
ऑक्टोबरमध्ये महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवण्यात आला होता
यापूर्वी ऑक्टोबर 2024 मध्ये, राज्य सरकारने जानेवारी 2024 पासून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ केली होती, त्यानंतर डीए 46% वरून 50% पर्यंत वाढला गेला होता.
याचा लाभ राज्य सरकारच्या नियमित वेतनश्रेणीत सुधारित वेतन मिळवणाऱ्यांना, कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना होणार आहे. Employees update