नमस्कार मित्रानो जर तुम्ही EPFO चे सदस्य असाल, तर EPFO ने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार, प्रत्येक नियोक्त्याने 15 तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांच्या EPF खात्यात दिलेले योगदान जमा करावे लागेल.
जेव्हा कंपनी EPF मध्ये योगदान देण्यास विलंब करते तेव्हा काय होते जाणुन घ्या माहिती
ईपीएफमध्ये योगदान देण्यास कोणत्याही प्रकारचा विलंब झाल्यास, त्यासाठी कंपनीवर दंड आणि व्याज आकारले जाते. यासाठी ईपीएफओच्या ( Epfo )वतीने केलेल्या ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे की, जर नियोक्त्याने योगदान दिले नाही तर उर्वरित रकमेवर दंड आणि व्याज भरावे लागेल.
जर हा विलंब 2 महिन्यांपेक्षा कमी असेल तर 5 टक्के दंड आकारला जाईल. 2 महिने ते 4 महिन्यांसाठी 10%, 4 ते 6 महिन्यांसाठी 15% आणि 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी 25%.
ईपीएफमध्ये पैसे जमा न केल्याने कर्मचारी हे पाऊल उचलतील
कंपनीकडून EPF मध्ये योगदान देण्यास कोणत्याही प्रकारचा विलंब झाल्यास कर्मचारी EPFO मध्ये नियोक्त्याविरुद्ध तक्रार करू शकतो, EPFO New Update ती रक्कम व्याज आणि दंडासह वसूल करू शकते.
दुसरीकडे, जर एखाद्या कंपनीने कर्मचार्याला पीएफ योगदानामध्ये उशीर केला, तर EPF कायदा 1952 च्या कलम 7Q नुसार, नियोक्त्याला उर्वरित रकमेवर 12% व्याज द्यावे लागेल.