Created by satish, 19 march 2025
Epfo update :- नमस्कार मित्रांनो EPFO म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO ने आपल्या एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स EDLI योजनेत तीन मोठे बदल केले आहेत.
या बदलांचा मुख्य उद्देश EPF सदस्यांच्या कुटुंबांना अधिक आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आणि मृत्यूच्या दाव्यांची प्रक्रिया सुलभ करणे हा आहे.योजनेतील या बदलांमुळे विमा संरक्षण वाढेल आणि सदस्यांच्या कुटुंबीयांना पूर्वीपेक्षा अधिक आर्थिक सुरक्षा मिळेल.EPFO New Rules
एका वर्षाच्या सेवेपूर्वी ईपीएफ सदस्याचा मृत्यू झाला तरीही लाभ मिळणार.
नवीन नियमांनुसार, नवीन ईपीएफ सदस्याचा नोकरीत रुजू झाल्यानंतर एका वर्षाच्या आत मृत्यू झाला तरी त्याच्या कुटुंबाला किमान 50,000 रुपयांचा विमा लाभ मिळेल.यापूर्वी अशा परिस्थितीत किमान रक्कम निश्चित केलेली नव्हती.
या संदर्भात ईपीएफओने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “एखाद्या EPF सदस्याचा एक वर्ष सतत सेवा पूर्ण केल्याशिवाय मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबाला किमान 50,000 रुपयांचा जीवन विमा लाभ मिळेल. या दुरुस्तीमुळे दरवर्षी सेवेदरम्यान मृत्यूच्या 5,000 हून अधिक प्रकरणांमध्ये कुटुंबातील सदस्यांना लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.”
काही दिवस योगदान थांबवले तरी EDLI लाभ मिळेल
दुसरा बदल त्या प्रकरणांशी संबंधित आहे ज्यामध्ये ईपीएफ सदस्याचा नोकरीवर असताना मृत्यू होतो, परंतु काही कारणास्तव त्याचे ईपीएफमधील योगदान काही काळ थांबले आहे.employees update
पूर्वीच्या नियमांनुसार, EPF सदस्य नॉन-कंट्रिब्युटरी कालावधीनंतर मरण पावला, तर कुटुंबाला EDLI योजनेचा लाभ मिळत नव्हता.हा सेवेबाहेरचा मृत्यू मानला जात असे.
परंतु नवीन नियमांनुसार, जर EPF सदस्याचा शेवटचा अंशदान मिळाल्यापासून 6 महिन्यांच्या आत मृत्यू झाला आणि त्याचे नाव कंपनीच्या रेकॉर्डमध्ये राहिले तर त्याच्या कुटुंबाला EDLI योजनेअंतर्गत विम्याचा लाभ मिळेल.epfo news
EDLI योजना काय आहे?
EPFO ची एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स EDLI योजना ही एक जीवन विमा योजना आहे जी EPF योजनेअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या कर्मचाऱ्यांना कव्हर करते.
ही योजना भारत सरकारने 1976 मध्ये सुरू केली होती.या योजनेंतर्गत, जर एखाद्या EPF सदस्याचा नोकरीवर असताना मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबाला कमाल 7 लाख रुपयांपर्यंतचा विमा लाभ मिळतो. Employees provident fund organization
EPFO ने केलेल्या या तीन सुधारणांमुळे EDLI योजना अधिक प्रभावी आणि सर्वसमावेशक बनली आहे.28 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या CBT 237 व्या बैठकीत जाहीर करण्यात आलेल्या या बदलांमुळे मृत्यूच्या दाव्याची प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक सुलभ होईल.ज्याचा दरवर्षी हजारो कुटुंबांना लाभ अपेक्षित आहे. Epfo update