पीएफचे पैसे या ठिकाणी गुंतवले जातात (EPFO Interest Rate
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (Employees Provident Fund Organization ) अनेक ठिकाणी पीएफ खातेदारांच्या खात्यात जमा केलेली रक्कम गुंतवते. या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या पैशांचा एक भाग खातेदारांना व्याज म्हणून दिला जातो. तो त्यांच्या खात्यात जमा केला जातो.
सध्या EPFO कर्ज पर्यायांमध्ये 85% गुंतवणूक करते. यामध्ये सरकारी असो किंवा खाजगी रोखे यांचाही समावेश आहे. उर्वरित 15% ETF मध्ये गुंतवले जाते. पीएफचे PF Provident fund चे व्याज कर्ज आणि इक्विटीच्या कमाईच्या आधारावर ठरवले जाते.
आता मोबाईल वरून पहा आपल्या PF मधील बॅलेन्स EPFO Member Portal
EPFO Member Portal : मित्रानो तुम्ही जर शासकीय कार्यालय किंवा खाजगी कंपनीत काम करत असाल तर तुमच्या पगारातील प्रत्येक महिन्यात प्रोविडेंट फंड PF ( Provident Fund ) नावाने पैसे कट होत असतात ते कोठे जमा होतात आणि आपले याआगोदर आतापर्यंत किती पैसे PF मध्ये जमा झाले आहे, हे आपण ते वेगवेगळ्या प्रकारे पाहणार आहोत.
✅️ उमंग ऍप Umang App द्वारे PF तपासा.
मित्रानो umang app हे एक सरकारी ऍप आहे ज्याद्वारे फक्त PF च नाही तर अजून खूप बाबींचा लाभ घेऊ शकतो. ते ही एकाच ठिकाणी.
- सर्वात अगोदर तुम्ही तुमच्या स्मार्ट फोन मध्ये प्लेस्टोअर ला जाऊन Umang App डाउनलोड करा.
- त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर ला रजिस्टर करून घ्या आणि लॉगिन करा.
- त्यानंतर टोपलेफ्ट कॉर्नर मध्ये मेन्यू असेल तेथे Service Directory ला क्लीक करा.
- यामध्ये EPFO ला सर्च करून क्लीक करा.
- त्यात तुम्हाला View Passbook ऑप्शन दिसेल त्याला क्लीक करा त्यानंतर तेथे तुमचा UAN नंबर टाका तो तुमच्या पगार पत्रक वर असेल.
- आता तुमच्या मोबाईल वर OTP आला असेल तो टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा बॅलेन्स दिसेल.
✅️ SMS द्वारे तुमचे PF तपासा.
- यासाठी तुमचा UAN नंबर EPFO च्या सोबत रजिस्टर्ड पाहिजे.
- तो UAN नंबर 7738299899 या मोबाईल नंबर वर ‘ EPFOHO UAN ENG ‘ असे टाईप करून पाठवावे.
- ही सर्व्हिस हिंदी, इंग्रजी, मराठी सोबतच 10 वेगवेगळ्या भाषाना लागू होते.
✅️ मिस्ड कॉल द्वारे तुमचा PF तपासा.
- SMS सर्व्हिस सारखेच मिस्ड कॉल द्वारे ही आपण आपले pf तापासू शकता.
- यासाठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल वरून 01122901406 या नंबर वर मिस्ड कॉल द्या.
- तुमच्या खात्याचे अपडेट लगेच तुमच्या समोर येईल.
अशा विविध तर्हेने तुम्ही तुमचे जमा झालेले PF तपासू शकता.
PF-Provident Fund