Close Visit Mhshetkari

     

कर्मचाऱ्यांची सेवापुस्तकात होणार नोंद.Employees letest news

Employees letest news :  नमस्कार मित्रांनो जिल्हा परिषदेमधील बदल्यांबाबत खोटे प्रमाणपत्र सादर करून बदल्यांमध्ये सूट घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना आळा बसावा यासाठी आता जिल्हा परिषद प्रशासनाकडून त्यांच्या या प्रमाणपत्राबाबत सेवापुस्तकामध्ये नोंद केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

जिल्हा परिषदेमधील वर्ग 3 आणि 4 च्या बदल्यांमध्ये भरपूर कर्मचाऱ्यांनी दिव्यांग, घटस्फोटीत परित्यकता तसेच मतिमंद किंवा गंभीर आजाराने आजारी असल्याची प्रमाणपत्रे सादर करून बादलीत सवलत मिळवली आहे. मात्र ही सर्व प्रमाणपत्रे वैध आहेत का.याबाबत संशय आहे.Employees letest news 

या संदर्भामध्ये जिल्हा परिषदेत प्रमाणपत्रांची तपासणी मोहीम सुरु केली आहे. जे कर्मचारी प्रमाणपत्र पडताळणी मध्ये दोषी ठरतील त्यांच्यावर निलंबणासहा बडतर्फीची कारवाई करण्यात येणार आहे. पन या पडताळणीची प्रक्रिया खातेप्रमुखांकडून व्यवस्तीत होताना दिसत नसल्याचे समोर येत आहे.Employees letest news 

जलसंधारण विभागाच्या बदली प्रक्रियेत एका महिलेने परित्यकता असल्याचे श्रीगोंदा नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर केले आहे. श्रीगोंदा येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हे प्रमाणपत्र कशाच्या आधारे दिले याबाबत शहानिशा केली असता.Employees letest news 

त्या महिलेने दिलेले स्वयंघोषणापत्र वा नगरपरिषद अध्यक्षांची शिफारस आधारकार्ड विवाह नोंदणी प्रमाणपत्र एवढ्याच कागदपतरांच्या आधारे हे प्रमाणपत्र वितरित केल्याचे दिसत आहे. या महिलेवर काय अन्याय झाला. त्याबाबतची कायदेशीर लढाई काय झाली याची काहीही कागदपत्रे नगरपरिषदेने पाहिलेली दिसत नाहीत.Employees letest news 

अशाच प्रकारे अनेक महिला परित्यकता किंवा घटस्फोटीता असल्याचे प्रमाणपत्र देतात. त्या आधारे पूर्ण सेवेत बदलीत लाभ घेतात परंतु दुसरीकडे आपल्या सोबत राहत असल्याचे प्रकारही समोर येत आहेत. या महिला परित्यकता किंवा घटस्फोटिता असल्याची नोंद सेवा पुस्तकात केली जातं नाही.Employees letest news 

त्यामुळे या महिलांचे पतीच त्यांचे कायदेशीर वारसदार राहतात त्यामुळे बनावट घटस्फोट दाखविणाऱ्यांचा फायदाच होतो. या बाबीला अटकाव घालण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन संवर्ग 1 मध्ये बदली घेतली असल्यास तसा उल्लेख संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकात करणार आहे. म्हणजे एखादी कर्मचारी खोटी परितक्ता असेल तर तिचा वारसदार पती ठरणार नाही….

Please follow and like us:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial