Created by satish, – 31 October 2024
आचारसंहिता पूर्वी बातमी
Employees update : राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. शुक्रवारी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने शासकीय निवासस्थान वर्षांमध्ये विविध मागण्या घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणीही उपस्थित होते. Employees Retirement Age केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वय ६० वर्षे करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे यासह विविध मागण्यांवर राज्य अधिकारी महासंघाने चर्चा केली. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याबाबत प्राधान्याने कार्यवाही करण्यात येईल, employees update
असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीसमोर आपली बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ देण्याची विनंती अधिकारी महासंघाने केली.
Employees update राज्य अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार जी.डी.कुलठे यांनी बोलताना सांगितले की, सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. Employee Retirement Age कुलथे म्हणाले की, आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. Employees update
या महिन्यात सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.आता मुख्यमंत्री कधी निर्णय घेतात ते बघू. कुलथे म्हणाले की, केंद्र सरकारच्या धर्तीवर देशातील 25 राज्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वर्षे आहे. तर महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ५८ वर्षे आहे. Employees update
लवकर याबाबत अधिकृत माहिती मिळेल.