DA Allowance news नमस्कार मित्रानो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनात लवकरच वाढ होणार असल्याचे कळते ती म्हणजे अशी कि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यामध्ये अजुन 4 टक्यानी वाढ होणार आहे.
जुलै 2023 साठी मित्रानो AICPI चा इंडेक्स नंबर आला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे परंतु यामध्ये त्याहून महत्वाचे असे कि जुलै 2023 पासूनचा जो DA वाढ होणार आहे त्याची घोषणा सरकार कडून लवकरच होऊ शकते. चला तर मग मित्रानो पाहूया संपूर्ण माहिती.
ऑक्टोबर मध्ये होणार वाढ. DA Allowance news
मित्रानो 7 व्या वेतन आयोगानुसार वेतन घेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ( Dearness allowance) वाढणार हे मात्र नक्की आहे. जानेवारी 2023 ते जून 2023 च्या AICPI इंडेक्स च्या आकड्यानुसार महागाई भत्ता देण्यात येईल. अजुन याबाबत ऑफिशिंयल घोषणा करण्यात आलेली नाही.
लवकरच दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर कर्मचाऱ्यांना गोड बातमी मिळू शकते, येणाऱ्या आगामी 17 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याबद्दल घोषणा होऊ शकते.
एकूण इतका वाढणार महागाई भत्ता. DA Allowance news
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्यात एकूण 4 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. जानेवारी 2023 पासून सध्या 42 टक्के महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना दिला जात आहे, परंतु यामध्ये 4 टक्के वाढ झाल्यानंतर ते एकूण 46 टक्के होईल. काही दिवसापूर्वी अशी ही बातमी आली होती कि महागाई भत्यामध्ये 3 टक्के वाढ होईल पण याबद्दल कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही.
AICPI इंडेक्स च्या नुसार जुलै 2023 पर्यंत एकूण महागाई भत्ता 46.24 टक्के पर्यंत पोहोचला आहे परंतु सरकार कडून यामध्ये पुढील दशांश बेरीज केली जात नाही. म्हणून यापुढे घोषणा झाल्यानंतर एकूण 46 टक्के महागाई भत्ता दिला जाईल.
DA Allowance news
इतका वाढणार पगार. DA Allowance news
मित्रानो समजा उदा. एका कर्मचाऱ्यांचे बेसिक
- कर्मचाऱ्यांचे बेसिक – 18000 रुपये
- नवीन महागाई भत्ता 46 टक्के – 8280
- आतापर्यंत महागाई भत्ता – 7560
- किती वाढला महागाई भत्ता – 7560 = 720 रु महिना.
- वार्षिक पगार वाढ – 8640 रुपये
720×12 = 8640 रुपये.
जास्तीत जास्त बेसिक सॅलरी 56900 रुपये कॅलकुलेशन.
- कर्मचारी बेसिक सॅलरी – 56900.
- नवीन महागाई भत्ता 46 टक्के – 26127.
- आतापर्यंत महागाई भत्ता 42 टक्के – 23897
- किती वाढणार महागाई भत्ता – 26174 – 23898 = 2276 रुपये / महिना
- 2276×12 = 27312.
कॅबिनेट बैठकीत होणार निर्णय.
वित्त मंत्रालय ( Finance Ministry )मार्फत महागाई भत्यात वाढ करण्यासाठी वित्तीय मंत्रालयाकडे प्रस्ताव दाखल करण्यात येईल. या प्रस्तावाला कॅबिनेट बैठकीत त्याला मंजुरी मिळेल. कॅबिनेट बैठकीत निर्णय झाल्यानंतर DA ची अधिकृत घोषणा करण्यात येईल. सध्याच्या स्थितीत एक करोड हुन अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेंशन धारकांना 7 व्या वेतन आयोगानुसार 7th pay commission च्या अंतर्गत 42 टक्के महागाई भत्ता मिळत आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना DA आणि पेंशन धारकांना DR दिला जातो. या अगोदर मार्च 2023 ला महागाई भत्यात 4 टक्के वाढ करून 42 टक्के करण्यात आला आहे. हा जानेवारी 2023 पासून लागू झाला आहे.
.