सरकारने 4% डीए वाढीची गणना कशी केली ? संपूर्ण गणना पहा. 7th Pay Commission
7th Pay Commission :
नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने 4 टक्के वाढीची घोषणा केली असून यात DA वाढीची गणना कशी केली जाते ते आपण या लेखात पाहूया. जर एखाद्याला महिन्याला 30,000 रुपये मूळ पेन्शन मिळत असेल तर त्याला महागाई सवलत म्हणून 11,400 रुपये मिळायचे. आता ही रक्कम वाढून 12,600 रुपये होईल, त्यामुळे पेन्शनमध्ये दरमहा 800 रुपयांची वाढ होईल.
7th Pay Commission :
सध्या देशात वाढणारी महागाई त्याची भरपाई करण्यासाठी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना डीए प्रदान केला जातो. केंद्र सरकार मार्फत एका सूत्राच्या आधारावर कर्मचाऱ्यांसाठी DA आणि DR मध्ये बदल केले जाते . DA आणि DR एका वर्षामध्ये दोन वेळा जानेवारी आणि जुलैमध्ये वाढवले जातात. सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जातो, तर पेन्शनधारकांना महागाई सवलत दिली जाते. खालील सूत्र आहे:
महागाई भत्ता टक्केवारी = ((गेल्या 12 महिन्यांतील अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकांची सरासरी (आधारभूत वर्ष 2001=100) -115.76)/115.76)x100.
केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचार्यांसाठी: महागाई भत्ता टक्केवारी = ((गेल्या 3 महिन्यांतील अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकांची सरासरी (आधारभूत वर्ष 2001=100) -126.33)/126.33)x100.
गेल्या 12 महिन्यांतील सरासरी CPI-IW सध्या 372.2 आहे. सूत्रानुसार डीए ४२.३७ टक्के येत आहे.
पगार किती वाढणार?
समजा एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याचा मासिक टेक होम पगार म्हणजे टेक होम पे सुमारे 42,000 रुपये आणि मूळ वेतन सुमारे 25,500 रुपये आहे; त्यामुळे त्याला 9,690 रुपये महागाई भत्ता मिळणार आहे. आता, डीएच्या ताज्या 4 टक्के वाढीनंतर ही डीए रक्कम 10,710 रुपये होईल. त्यामुळे मासिक टेक होम पगारात 1,020 रुपयांची वाढ होणार आहे.
त्याचप्रमाणे 69.76 लाख पेन्शनधारकांच्या मासिक पेन्शनमध्येही वाढ होणार आहे. उदाहरणामध्ये जर एखाद्या व्यक्तीला प्रत्येक महिन्याला 30 हजार रुपये मूळ पेन्शन मिळत असेल तर त्याला महागाई सवलत म्हणून 11,400 रुपये मिळायचे. आता ही रक्कम वाढून 12,600 रुपये होईल, त्यामुळे पेन्शनमध्ये दरमहा 800 रुपयांची वाढ होईल.
यापूर्वी, DA मधील शेवटची सुधारणा 28 सप्टेंबर 2022 रोजी करण्यात आली होती, जी 1 जुलै 2022 पासून लागू झाली होती. अखिल भारतीय 12-मासिक सरासरी वाढीच्या टक्केवारीच्या आधारावर केंद्राने डीए चार टक्के पॉइंट्सने वाढवून 38 टक्के केला होता. जून 2022 रोजी संपलेल्या कालावधीसाठी ग्राहक किंमत निर्देशांक.