Maharashtra DA Hike: महाराष्ट्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा राज्यातील 7.50 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. डीएमधील ही वाढ केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या डीएच्या बरोबरीने असेल.
30 जुन रोजी शासकीय निर्णय जारी झाला आहे त्यानुसार जुन देय जुलै च्या वेतनात थकबाकी सह DA ची रक्कम देण्यात येईल.
सध्या केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये ४ टक्के महागाई भत्त्याची तफावत आहे. आता ही तफावत संपवत सरकार राज्य कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात ४% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे
मार्च 2023 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याचा दर वाढवून 42% करण्यात आला होता. त्यानंतर महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्यात आली. आता त्याच धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना 38 ऐवजी 42 टक्के DA चा लाभ मिळेल.
आता जुलै 2023 साठी महागाई भत्ता जाहीर होणार आहे. त्याची अंमलबजावणी जुलै 2023 पासून होणार आहे. त्याची घोषणा होण्यासाठी सप्टेंबर ते ऑक्टोबरपर्यंत वेळ लागू शकतो.
सरकारवर किती बोजा वाढणार
महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर राज्य सरकारवर वार्षिक 1,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. येणाऱ्या जुन देय जुलै च्या वेतनामध्ये कर्मचाऱ्यांना जानेवारी 2023 ते जुन 2023 पर्यंतच्या थकबाकी सह रक्कम वेतनामध्ये मिळेल