या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश, महागाई भत्यांसह इतर मागण्या मान्य, संघटनेकडून आंदोलन मागे. DA Allowance news.
DA Allowance news : मुंबई : महागाई भत्त्यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदान येथे पुकारलेले आंदोलन सरकारसोबत झालेल्या यशस्वी चर्चेनंतर मागे घेतले आहे . सप्टेंबरपासूनच्या वेतनात ४२ टक्के महागाई भत्ता देण्यात येईल , तसेच पंधरा दिवसांत सर्व थकबाकीवर निर्णय घेण्यात येणार आहे , सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना व पत्नीला एसटीत मोफत प्रवास या सर्व मागण्या मान्य झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेकडून आंदोलन मागे घेण्याची घोषणा करण्यात आली आहे .
आंदोलनकर्त्यां कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत मंत्री उदय सामंत यांच्यासोबत दुपारी झालेल्या बैठकीनंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या कळवल्या . त्यानंतर सरकारकडून लेखी आश्वासन देत बहुतांशी मागण्या पूर्ण करण्यात आल्या . सुरू झालेले आंदोलन एकाच दिवसात मिटविण्यात सरकारला यश आले आहे त्यातील पुढीलप्रमाणे मागण्या मंजुर करण्यात आले आहेत. DA Allowance news
- ” सप्टेंबर पेड इन ऑक्टोबरच्या वेतनापासून महागाई भत्ता ३४ टक्क्यांवरून ४२ टक्के देण्यात येईल
- ■ सर्व थकबाकीसंदर्भात १५ दिवसांत मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री अर्थमंत्री , उद्योगमंत्री व एसटी कामगार संघटनेसमवेत चर्चा करून निर्णय घेतला जाईल “
- सण उचल १२,५०० रुपये मूळ वेतनाची अट न घालता दिले जाईल
- ■ कामगारांना १० वर्षासाठी सातवा वेतन आयोग देणे , एकतर्फी वेतनवाढीतील रु ४८४ ९ / – कोटींमधील उर्वरित रक्कम …. मूळ वेतनातील रु . ५००० / – , ४००० / – व २५०० / – मधील तफावती दूर करण्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल .
- ■ कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना , तसेच सेवानिवृत्त कामगार व पत्नीस सर्व प्रकारच्या बसमध्ये कुठलाही फरक न आकारता मोफत पास देणार .
DA Allowance news
या संपूर्ण मागण्या संदर्भात चर्चा करण्यात आली