DA 18 month Arrers : नमस्कार मित्रानो सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडुन मोठा झटका मिळाला आहे. कर्मचाऱ्यांसाठी ही खुप महत्वाची बातमी आलेली आहे. 18 महिन्यांच्या DA थकबाकी म्हणजेच महागाई भत्याबाबत महत्वाची अपडेट दिली गेली आहे.
याबाबत केंद्र सरकारने राज्यसभेत लिखित स्वरूपात माहिती दिली आहे वित्त मंत्रालयाकडुन ( Finance Ministry ) दिल्या गेलेल्या या माहितीसोबतच सर्व कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा तुटलेल्या आहेत. आता 18 महिन्यांच्या DA महागाई भत्याची थकबाकी मिळणार नसल्याचे सरकार कडुन स्पष्ट करण्यात आलेले आहे. तीन हफ्त्यात रक्कम देण्याची कोणतीही तरतूद नाही.
18 महिन्यांची DA थकबाकी मिळणार नाही.
मित्रानो सरकारमार्फत 18 महिन्यांची रक्कम मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे. कोरोना काळात DA चे एकूण तीन हफ्ते म्हणजेच 1 जानेवारी 2020 , 1 जुलै 2020, 1 जानेवारी 2021 या महिन्यांचे महागाई भत्ता थांबवण्यात आला होता. DA 18 month Arrers
यानंतर सरकारमार्फत हा बाकी असलेला महागाई भत्ता जुलै 2021 मध्ये बहाल केला, मात्र त्याची तब्बल दीड वर्षाची थकबाकी देण्यात आलेली नाही, कर्मचाऱ्यांना आशा होती की ती रक्कम त्यांना मिळेल मात्र असे झाले नाही सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के महागाई भत्ता देण्यात आलेला आहे.
लवकरच जुलै 2023 मध्ये पुढील टप्यात एकूण अजुन 4 टक्के वाढणार असल्याचे बोलले जात आहे.