चॅट जीपीटी म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते? OpenAI द्वारे GPT चॅट करा
अनेकांना नोकरी गमवण्याची धास्ती लावणारं तसेच गुगलला टक्कर देण्याच्या चर्चा असणार Chat GTP नक्की आहे तरी काय? आणि हे काम कस करत?
ओपनएआयने चॅट जीपीटी 30 नोव्हेंबर 2022 रोजी लाँच केल आणि लोन्चींगपासून इंटरनेटवर आणि तंत्रज्ञानाच्या जगात चॅट जीपीटीची खूप वेगाने चर्चा होत आहे. अनेकजण मग त्यात सर्वसामान्य असोत किंवा तज्ञ मंडळी सर्वच जन चॅट GPT वर आपापले मत मांडत आहेत. यामुळेच अनेकांना याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. यावर काहीजण सांगतात कि यामुळे मानवी नोकऱ्या संपुष्टात येतील, तर काहीजण याकडे गुगल सर्चला पर्याय म्हणून पाहतात, यामुळेच कि काय गुगलसारख्या अनेक सॉफ्टवेअर्स, सर्च इंजिनची जागा घेईल अशी शक्यता वर्तवण्यात येते, म्हणूनच आपण चॅट जीपीटीची सत्यता काय आहे आणि तज्ञांचे हे दावे किती मजबूत आहेत, याविषयी समजून घेण्याचा प्रयत्न करूयात.
Chat GPT साठी आपल्याला थोडा वेळ वाट पहावी लागणार आहे. कारण सध्या तरी यावर काम सुरू आहे परंतु येणाऱ्या काळात नक्कीच ते आपल्यासारख्या असंख्य लोकांपर्यंत पोहोचवले जाईल. याची मिडिया ट्रायल करण्यात आली यामध्ये सोशल मीडिया युझर्स म्हणून ज्या लोकांनी याची ट्रायल केली आहे त्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. chat.openai.com हि 30 नोव्हेंबर 2022 रोजी लॉन्च झालेल्या chat GTP ची अधिकृत वेबसाइट आहे. आजघडीला याची युझर्स संख्या सुमारे 2 दशलक्षांपर्यंत पोहोचली आहे.
ओपनएआयने विकसित केलेले चॅट जीपीट काहीस गुगल सर्च इंजिनप्रमाणे आहे. यामध्ये फक्त उत्तर देण्याची पद्धत गुगलपेक्षा खूप वेगळी आहे. आपल्याला Google कोणत्याही प्रश्नाला उत्तर म्हणून अनेक वेबसाइट्सच्या लिंक दाखवते, तर चॅट GPT आपल्याला प्रश्नाचे थेट उत्तर देते. याला आपण कोणताही प्रश्न विचारून त्या प्रश्नांचे तपशीलवार उत्तर लेखाच्या स्वरूपात मिळवू शकतो.
चॅट GPT काय आहे?
सर्वप्रथम आपण चॅट जीपीटी चा फुलफोर्म पाहू. Chat Generative Pre-Trained Transformer (चैट जनरेटिव प्री – ट्रेंड ट्रांसफॉर्मर) हा त्याचा फुल फोर्म आहे. हे एक प्रकारचे चॅट बॉट आहे जे ओपन आर्टिफिशियल इंटेलिजन्सने तयार केले आहे. हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करेल. हे एक प्रकारचे सर्च इंजीनच असणार आहे. याकडून तुम्ही सहजपणे बोलून तुमच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे मिळवू शकता.
परंतु हे नुकतच लॉन्च झाल असल्यामुळे सध्या केवळ इंग्रजी भाषेत वापरण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध आहे. पण लवकरच आपण आपल्या मराठी भाषेत देखील याचा वापर करू शकणार आहे, कारण पुढे जाऊन इतर भाषांनाही जोडण्याची तरतूद यात करण्यात आली आहे.
चॅट GPT चा आजवरचा प्रवास…
चॅट GPT ची सुरुवात सॅम ऑल्टमन नावाच्या व्यक्तीने 2015 मध्ये एलोन मस्कच्या सहकार्याने नॉन प्रोफीट कंपनी म्हणून केली होती, परंतु काही काळानंतर एलोन मस्क यांनी हा प्रकल्प मधेच मध्येच सोडून दिला.
जस म्हणतात ना “हीरे की परख जौहरी को होती है” तसच काहीस झाल आणि बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीने चॅट GPT मध्ये गुंतवणूक केली आणि जस कि आपल्याला माहित आहे 30 नोव्हेंबर 2022 रोजी Chat GPT एक प्रोटोटाइप म्हणून लाँच करण्यात आली. ओपन आर्टिफिशियल इंटेलिजेंसचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऑल्टमन यांच्या मते, ते आतापर्यंत 20 दशलक्ष वापरकर्त्यांपर्यंत पोहोचले आहे आणि वापरकर्त्यांची संख्या सतत वाढत आहे.
चॅट GPT कसे कार्य करते ?
तसे पाहता याच्या कार्याबद्दल कंपनीने त्यांच्या वेबसाइटवर तपशीलवार माहिती दिली आहे. हा उपलब्ध डेटा त्यांनी युझर्सना प्रशिक्षित करण्यासाठी दिला आहे.
परंतु आपल्या वाचकांसाठी आपण दुसर्या एका सोप्या पद्धतीने हे काम कसे करते हे समजून घेऊ, यासाठी, त्याचे पूर्ण स्वरूप समजून घेणे गरजेच आहे.
Generative -जनरेटिव्ह म्हणजे जो निर्माण करतो.
Pre-Trained -पूर्व-प्रशिक्षित म्हणजे जे आधीच प्रशिक्षित आहे.
Transformer -ट्रान्सफॉर्मर म्हणजे दिलेला मजकूर समजणारे मशीन लर्निंग मॉडेल.
आपण जीपीटी चॅटला कोणताही प्रश्न विचारलात तर तो त्याच्या डेटा बेसमधून त्याचे उत्तर शोधून काढतो आणि योग्य भाषेत लेखाच्या स्वरूपात आपल्यासमोर मांडतो. दिलेल्या उत्तराने आपण समाधानी आहात की नाही हे सांगण्याचा पर्यायही येथे मिळेल. आपण जे काही उत्तर द्याल त्यानुसार ते त्याचा डेटा सतत अपडेट करत राहते.
चॅट GPT ची विशेष वैशिष्ट्ये…
आता चॅट GPT ची मुख्य वैशिष्ट्ये कोणती आहेत याबद्दल देखील माहिती घेऊया.
त्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही येथे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लेखाच्या स्वरूपात तपशीलवार दिली आहेत.
चॅट GPT चा वापर आपण कंटेंट तयार करण्यासाठी देखील करू शकता. तसेच याच्या मदतीने तुम्ही अर्ज, निबंध, चरित्र इत्यादी गोष्टी लिहू शकता.
तुम्ही येथे कोणताही प्रश्न विचारता क्षणी म्हणजेच रिअल टाइममध्ये उत्तर मिळवू शकता आणि आपले समाधान झाले किंवा नाही यावर प्रतिक्रिया %