आता जात पडताळणी झाली आणखीनच सोपी, अशी करा तुमची जात पडताळणी Caste Validity 2023
मित्रानो या ब्लॉग मध्ये आपण Caste Validity 2023 जात पडताळणी कशी करावी याबद्दल माहिती पाहणार आहोत , त्यात अर्ज कसा करावा त्याला कागदपत्रे कोणकोणते लागतात. कोणाला हे काढता येईल याबद्दल सर्व माहिती पाहणार आहोत त्यामुळे हे आर्टिकल संपूर्ण वाचा.
जात पडताळणी ( Caste Validity 2023)
जात पडताळणी Caste Validity प्रक्रिया हि सुरु झाली आहे , या साठी तुम्ही अर्ज ऑफलाईन करू शकणार आहात.जे विद्यार्थी सध्या 10 वि किंवा 12 वि Science मध्ये आहेत तशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर जात पडताळणी करून घ्यावी . 12 वि विज्ञान असणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप उपयोगाचे ठरणार आहे.
आणि समजा तुम्हाला एखाद्या नौकरी साठी जात पडताळणी प्रमाण पत्र लागत असेल तर त्यानुसार तुम्हाला कधीही हे कागदपत्र मिळू शकते. त्या साठी खाली दिलेले सर्व कागदपत्रे लागतील आणि तुम्ही ज्या ठिकाणी नौकरीला जॉईन झालात तेथील जॉईन ऑर्डर किंवा तेथील मुख्य अधिकारी यांच्या सहिचे पत्र लागेल .
सध्याला 11 वि 12 वि सायन्स च्या विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे . त्यासाठी पुढील प्रमाने तारीख दिली आहे.
जात पडताळणी प्रकिया सुरु 2023 | अर्ज कसा करावा.
2023-2024 या शैक्षणीक वर्षासाठी जात पडताळणी करण्याची प्रक्रिया हि सुरु झाली आहे. .त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना जात पडताळणी करायची आहे त्यांनी त्यांच्या विद्यालयातून जात पडताळणीसाठी पत्र आणि 15 नंबर फॉर्म घ्यावा आणि नेट कॅफे वर ऑनलाईन भरावा.
मित्रानो फॉर्म साठी जातिचे प्रमाणपत्र झेरोक्स 2 ) बोनाफाईड झेरॉक्स 3) आधार झेरॉक्स अर्जासोबत जोड़ावा लागेल . आणि हा भरलेला फॉर्म आणि खाली कागदपत्रे दिलेले आहेत . ते घेऊन समाजकल्याण कार्यालयात जात पडताळणी ऑफिस मध्ये भरावा
जात पडताळणी Caste validity करण्यासाठी लागणारे कागदपत्रे
- कार्यालय प्रमुख / प्राचार्य यांचे पत्र.
- अर्ज दाराचा ऑनलाईन भरलेला अर्ज.
- जात प्रमानपत्र ( मुळ आणि छायांकित प्रतिसह )
- प्रतीज्ञा पत्र.
- वंशावळ
- चालू वर्षाचे बोनाफाईड सोबत आणावे.
- अर्ज दाराच्या ओळखपत्राची साक्षांकित प्रत , पॅनकार्ड , आधारकार्ड .
- अर्ज दाराचा शाळा सोडल्याचा दाखला व प्रवेश निर्गम .
- अर्जदाराच्या वडीलाचा शाळा सोडल्याचा दाखला व निर्गम.
- अर्जदार यांचे चुलते , आत्या , चुलत चुलते , चुलत आत्या यांचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा निर्गम उतारा.
- 1951 चा नागरिकांचे राष्ट्र रजिष्टर उतार्याची साक्षांकित प्रत.
- कोतवाल बुकाचे उतार्याची साक्षांकित प्रत .
- खासरा प्रमाणपञक किंवा हक्क नोंदणी पत्रक याची साक्षांकित.
- आधार कार्ड .
“Caste Validity Apply online / Ofline”
हे सर्व कागदपत्रे जमा करून समाजकल्याण कार्यालयात जमा करावे . लगेच काही दिवसात तुमचे पडताळणी पत्रक तुम्हाला मिळेल . खाजगी एजंट ला पैसे देण्याची आवश्यकता नाही. तुम्ही सर्व कागदपत्रे जमा केल्या नंतर सरकारी फीस जमा करावी लागेल आणि त्याप्रमाणे पुढील 2 ते 3 आठवडय़ात तुमचे जात पडताळणी प्रमाणपत्र जमा होईल आणि तुम्हाला मिळून जाईल .
Caste Validity Apply online / Ofline