Close Visit Mhshetkari

     
Csc bank mitra 2023

CSC बँक मित्र बना घरबसल्या काम करून पैसे कमवा, . Bank Mitra information in marathi 2023.

CSC बँक मित्र बना घरबसल्या काम करून पैसे कमवा, . Bank Mitra information in marathi 2023.

Bank Mitra information in marathi 2023. मित्रानो कोणतीही सरकारी बँक ही फक्त बँकिंग चे सर्व्हिस च देते असे नाही तर आपल्यासोबत मिळून काम करण्याची संधी ही उपलब्ध करून देते तर हे बँक मित्र काय आहे, आपण कसे बॅंकमित्र बनाल, पगार काय मिळेल अशी सर्व माहिती पाहूया.

✔️ Bank Mitra बँक मित्र काय आहे. संपूर्ण प्रोसेस.

तुम्हीही सरकारी बँकेसोबत ( Government Bank ) मिळून पैसे कमावू शकता. त्यात सर्वात मोठी सरकारी बँक असलेली SBI  स्टेट बँक ऑफ इंडिया सुद्धा वेळोवेळी नवीन अर्ज मागवून घेत असते. जर तुमच्या जवळ कोणतीही नौकेरी नाही तर तुम्हीही बँक मित्र Bank Mitra बनून जास्तीत जास्त पैसे कमावू शकता. या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्या साठी संपूर्ण माहिती उपलब्ध करून देत आहोत.

असे खूप सारा तरुण वर्ग आहे ज्यांचे शिक्षण पूर्ण झाले आहे परंतु अजून कोणतीही नौकरी लागली नाही अथवा बेरोजगार आहेत त्यामध्ये तुम्ही फक्त 10 वी किंवा 12 असलात तरी चालेल तुम्ही ही घरबसल्या बँकेसोबत काम करून पैसे कमाऊ शकता.

जसे कि तुम्हाला नावाने समजलेच असेल कि बँक मित्र म्हणजे काही बँकेच्या संबंधित असावा. जर तुम्ही ग्रामीण भागात राहतात तर तुम्हाला माहितीच असेल कि तुम्हाला बँकेचे Bank Account नवीन अकाउंट काढायचे आहे किंवा पैसे पाठवणे, पैसे काढणे  अशा कामासाठी तुमच्या गावापासून दूर ज्याठिकाणी बँक आहे तेथे जावे लागते. तेथे जाऊन सुद्धा काम होईल किंवा नाही याची शक्यता नसते.

याच कामाना एक बँक मित्र सोपे करतो. हे बँक मित्र कोणत्याही एका बँकेशी संलग्न राहून सर्व कामे करतो त्यात नवीन अकाउंट New Bank Account काढणे असेल किंवा, पैसे काढणे, पाठवणे असतील, अशा प्रकारचे सर्व कामे बँक मीत्र Bank Friend करत असतो. यामुळे तुम्ही जर बँक मित्र झालात तर लोकांची कामे गावात करून तुम्ही त्यांच्याकडून त्या कामाचा मोबदला ही घेऊ शकता.

Csc bank mitra 2023

✔️ बँक मित्र बनलात तर फायदा.

मित्रानो बँक मित्र झाल्यानंतर तुम्हाला प्रति महिना 5 हजार रुपये आणि जेवढे Transaction होतील किंवा जर कोणी नवीन बँक खाते काढले तर त्यामध्ये सुद्दा तुम्हाला कमिशन मिळेल यामुळे तुम्ही घरबसल्या 25 ते 30 हजार रुपयापर्यंत पैसे कमावू शकता. जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहत असताल तर याचा तुम्हाला जास्त फायदा मिळेल कारण बँक मित्रांची आवश्यकता जास्तीत जास्त ग्रामीण भागातच असते.

जर तुम्हाला कंप्युटर आणि इंटरनेट Computer and Internet विषयी थोडेफार ज्ञान असेल तर तुम्ही ही आरामात काम करू शकता जर तुम्हाला कॉम्पुटर ज्ञान नसेल तरीही तुम्ही कंप्युटर कोर्स करून घ्या ज्यामध्ये तुम्हाला कंप्युटर विषयी ज्ञान होईल यानंतर तुम्ही Bank Mitra साठी Apply करू शकता.

📌 हे हि वाचा 👇👇

LIC जीवन शांती मध्ये गुंतवणूक करून मिळवा लाखो रुपये.

PayTM देत आहे 2 लाखापर्यंत कर्ज.

SBI सोबत मिळून करा काम, स्वतःचे ATM टाकून कमवा लाखो 

 

 

✔️ बँक मित्र साठी लागणारी पात्रता.

  • अर्ज करणाऱ्याचे वय हे कमीत कमी 21 वर्ष असावे.
  • तुमचे शिक्षण हे कमीत कमी 10 वी किंवा 12 असावे.
  • बँकेचे काम कसे करावे याबद्दल थोडीशी माहिती असावि.
  • कंप्युटर आणि इंटरनेट याबद्दल माहिती असावी.
  • तुम्हांला एक ठिकाण हवे असेल ज्याठिकाणी तुम्ही बसून कामे करू शकता आणि ग्राहक सेवा केंद्र grahak seva kendra ओपन करू शकता.
  • तुम्हाला या सर्व गोष्टीची जिम्मेदारी घ्यावी लागेल कारण या सर्व गोष्टीला हाताळता आले पाहिजे.

“Bank Mitra Information In marathi 2023.”

✔️ Bank Mitra होण्यासाठी लागणारी कागदपत्रे.

  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. पासपोर्ट साईज फोटो
  4. NOC सर्टिफिकेट
  5. बँकेचे अकाउंट .
  6. एक कॅन्सल चेक आणि बँकेचे पासबुक

अशा प्रकारची सर्व कागदपत्रे bank mitra साठी असणे आवश्यक आहे.

✔️ बँक मित्र होण्यासाठी कोणत्या वस्तू लागतील.

फक्त तोच व्यक्ती बँक मित्र होण्यासाठी अर्ज करू शकतो ज्याच्याकडे कंप्युटर अथवा लॅपटॉप आहे. इंटरनेट ची सुविधा आहे. त्यानंतर प्रिंटर स्कॅनर, टेबल, आणि या वस्तू ठेवण्यासाठी छोटीशी जागा.  या वस्तू तुमच्या कडे असतील तर तुम्हीही बँक मित्र साठी अर्ज करू शकता.

वरील सर्व गोष्टीची पूर्तता जर तुम्ही करत असताल तर तुम्ही ही बँक मित्र बनू शकता आणि पैसे कमावू शकता. त्यासाठी जवळील बँकेस वेळोवेळी संपर्क साधावा लागेल त्यात कोणतीही बँक असो SBI Bank असो किंवा Maharashtra Gramin Bank असो तुम्हाला जी आवडेल त्यामध्ये तुम्ही मिळून काम करू शकता.

👉👉बँक मित्र ID बनवण्यासाठी येथे अर्ज करा 👈

‘Bank Mitra Information In marathi 2023

धन्यवाद………..

 

Please follow and like us:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial