वय संपलेल्या उमेदवारांना ही नौकरीची संधी नवीन GR आला .
11-09 2021 चा जो शासन निर्णय घेण्यात आला होता कि अनुकंपा साठी ( Anukampa ) दरवर्षी निघणारी सरळसेवा भरती मधील 20 टक्के पदे हि अनुकंपा नुसार भरण्यात यावी असा GR Maharashtra GR Maharashtra सरकार मार्फत काढण्यात आला होता आणि त्याला 30- 12-2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती परंतु मागील 2 वर्षापासुन कोरोना सारख्या विषाणू ने राज्य आणि देशात धुमाकूळ घातला , त्या मध्ये अनुकंपा भरती मधील कमी प्रमाणात होणाऱ्या नियुक्त्या असतील किंवा वाढत जाणारी प्रतिक्षा सुची विविध संस्था आणि लोक प्रतिनिधि यांच्या कडून मिळणारी मागणी सरकारने लक्षात घेऊन.
आणि राज्यात सरळसेवा भरती हि ठप्प झाली होती. परंतु आता हळू हळू जीवन सुरळीत होत असताना नवीनतम भरती प्रक्रिया राबवन्यात येत आहेत अशा स्थितीत अनुकंपा उमेदवराना दिलासा देनारी बातमी मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आली.
नविन GR Maharashtra
त्यामधे हि मुदत 1-1-2022 पासून 31-12-2024 पर्यंत म्हणजेच पुढील दोन वर्ष वाढवल्यामुळे अनुकंपा तत्वावर परीक्षा देणाऱ्या उमेदवाराना दिलासा मिळाला आहे. यापुढे पुढील 2 वर्ष ज्या काही सरळसेवा भरती निघतील त्यात यांना फायदा मिळेल. त्यानुसार GR Maharashtra सरकार कडून काढण्यात आला.
-
कोणत्या भरती मध्ये फायदा मिळणार
- राज्यातील महानगर पालिका.
- नगरपालिका भरती
- जिल्हा परिषद भरती
- पोलीस भरती
- एस टी महामंडळ भरती
- आरोग्य भरती
- भूमी अभिलेख भरती
- विविध महामंडळ
- न्यायालय भरती.
- तलाठी भरती
- ग्रामसेवक भरती
- विविध आस्थापना ज्या राज्य सरकारच्या आहेत अशा सर्व भरती परीक्षा यामध्ये हे आरक्षण लागू असेल.
तसेंच वित्त विभागा कडून ज्या भरती प्रक्रिये मध्ये निर्बंध आहेत आणि ज्या गट क आणि गट ड पदासाठी निर्बंध नाहीत अशा सर्व भरती साठीच्या बाबतीत सरळ सेवेने घेतल्या जाणाऱ्या भरती मध्ये 20 टक्के जागा या अनुकंपा उमेदवराना लागू असतील ‘GR Maharashtra ‘GR Maharashtra ‘ यामुळे अनुकंपा उमेदवराना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.
हे हि वाचा , वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवाराना परीक्षेला बसण्याची नवीन संधी.
-
अधिकारी आणि उमेदवाराना अडचण निर्माण होऊ नये म्हणून खालील प्रमाने मार्गदर्शन करण्यात आले
- या GR नुसार अनुकंपा तत्वावर उमेदवाराची कार्य पद्धती हि दिनांक 26/08/2021 च्या शासन निर्णया नुसार यांचे अवलोकन करण्यात येईल.
- 26/08/2021 च्या निर्णया च्या मुद्दा अ 1 मधील नुसार सरळसेवेच्या दरवर्षी च्या पदाची संख्या निश्चित करून त्यातील 20 टक्के पदे हि अनुकंपा नुसार भरण्यात येईल.
- जर महाराष्ट्र लोकसेवा आयोगने रिक्त पदाची संख्या मागितली तर 20 टक्के अनुकंपा चे पदे भरून 80 टक्के पदाचे मागणी पत्र पाठविण्यात येणार.