एस.टी. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षभरासाठी मोफत प्रवास पास –
MSRTC pass for retired employees
मुंबई – MSRTC pass for retired employees राज्य परिवहन विभागाच्या (एस.टी.) सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना यापूर्वी फक्त सहा महिने, त्यानंतर नऊ महिन्यांसाठी मोफत प्रवास पास दिला जात होता. मात्र आता हे पास वर्षभरासाठी मंजूर करण्यात आले आहेत. हे शक्य होण्यामागे दापोली आगारातून सेवानिवृत्त झालेले वाहतूक नियंत्रक चंद्रकांत लक्ष्मण मोरे यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत.
मोरे यांनी शासनाकडे पुराव्यांसह पाठपुरावा केल्यामुळे एस.टी. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षभर मोफत प्रवासाचा लाभ घेता येणार आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील एस.टी. कर्मचाऱ्यांत समाधानाचे वातावरण असून त्यांनी मोरे यांचे जाहीर आभार मानले आहेत.
चंद्रकांत मोरे यांनी केवळ वर्षभर मोफत पासच नव्हे, तर एस.टी.च्या सर्व प्रकारच्या बसेससाठी भाड्यातील फरक न भरता पास मान्य करण्यात यावा, यासाठीही प्रयत्न केले. त्यांच्या या मागणीमुळे अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. MSRTC pass for retired employees
या निर्णयामुळे एस.टी.च्या हजारो सेवानिवृत्त कर्मचारी बांधवांना वर्षभर प्रवासाची सुविधा मोफत मिळणार असून, पूर्वी ज्या पासची मुदत संपल्यानंतर प्रवासात अडचणी येत होत्या, त्या समस्या आता दूर झाल्या आहेत. विशेषतः महिला व वयोवृद्ध कर्मचाऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. MSRTC pass for retired employees
मोरे यांच्या या प्रयत्नामुळे एस.टी. प्रशासनाकडून घेतलेली ही महत्त्वपूर्ण सुधारणा वास्तवात उतरली असून, ती इतर सरकारी विभागांतील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरू शकते.